इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका शुक्रवारी (16 जून) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर सुरू आहे. इंग्लंडने सामन्याच्या दोन दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली होती. शुक्रवारी नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिचेल स्टार्क याचे नाव नव्हते. स्टार्कला संघातून वगळल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि संघ व्यवस्थापनाने ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले नाही. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazelwood) याला खेळता यावे, म्हणून स्टार्कला संघाबाहेर बसवले गेल्याचे सांगितले जात आहे. भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या स्कॉट बोलँड (Scott Boland) यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले आहे. डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात बोलँडला हेजलवूडच्या जागी घेतले गेले होते. पण त्याचे या सामन्यातील प्रदर्शन चांगले राहिले आणि ऍशेसच्या पहिल्या सामन्यात देखील त्याला संघात कायम ठेवले गेले.
Mitchell Starc skips IPL for test cricket and Australia dropped him in Ashes ???????????? pic.twitter.com/qoulo24ffU
— ANSHUMAN???? (@AvengerReturns) June 16, 2023
Australia have excluded Mitchell Starc from the playing eleven… Can India do the same with Bumrah due to the same reason?
— Sarthak Thakur (@5a7b359c50eb4be) June 16, 2023
Mitchell Starc vs England :
74 Wickets
27.46 Average
3.30 EconomySimply Sensational, Mitchell Starc ????
Has Australia made a mistake by leaving him out of the playing XI? #Ashes2023 #ENGvAUS #Starc pic.twitter.com/gM6WTg263u
— Foresay Sports | Lets Relive 2011 WC Finals (@ForesayCricket) June 16, 2023
भारताविरुद्ध बोलँडने पहिल्या डावात 2, तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे जोश हेजलवुड काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. चाहते असेही म्हणत आहेत की, जोश हेजलवूड आयपीएल खेळूनदेखील ऍशेस खेळत आहे. दुसरीकडे मिचेल स्टार्क मात्र ऍशेस मालिकेसाठी आयपीएल देखील खेळला नाही, पण तरीही त्याला संघातून बाहेर ठेवले गेले आहेत. स्टार्क पहिल्या कसोटीसाठी संघात नसल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांच्या अक्षरशः पूर आला आहे.
दरम्यान, ऍशेस 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली होती. मागच्या वर्षीची ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळली गेली असून मायदेशातील या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 असा विजय मिळवला होता. यावेळीही दोघा संघांतील टक्कर पाहण्यासारखी असेल. (Mitchell Starc, who has not played in IPL for the Ashes, has not got a chance to play in the first Test)
महत्वाच्या बातम्या –
“विराटला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले”, माजी कर्णधाराचा मोठा आरोप
Ashes 2023: पहिल्या कसोटीत इंग्लंडचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय, ऑस्ट्रेलिया संघातून स्टार्क बाहेर