पुणे, १९ डिसेंबर २०२३: राज्य राखीव पोलीस दल (SRPF) पुणे संघाने यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीला पराभूत करीत एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.
यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीला १-० गोलने पराभूत करण्यापूर्वी एस आर पी एफ संघाला कठोर परिश्रम करावे लागले. सामन्यातील महत्त्वाचा गोल किशोर पाटील (४४वे) याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. उपांत्यपूर्व फेरीत जीएसटी कस्टम्स, पुणे, हॉकी लव्हर्स क्लब, मध्य रेल्वे क्लब पुणे, क्रीडा प्रबोधिनी आणि पीसीएमसी यांनी यापूर्वीच आपला प्रवेश निश्चित केला आहे.
धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. इन्कम टॅक्स पुणे इलेव्हनने पात्र होण्याच्या संधी कायम ठेवताना रेल्वे लाइन बॉईजला ३-१ असे पराभूत केले. विक्रम सिंग (२५ वे) आणि मोहम्मद शाकीर (३७ वे) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले तर २९ व्या मिनिटाला एम. दानिश याने मैदानी गोल केला.
मुंबई रिपब्लिकन आणि किड्स इलेव्हन यांच्यातील मुंबई संघाने १०-१ असा मोठ्या फरकाने जिंकला आणि साखळी गटात पहिला विजय नोंदवला.
निकाल
एसआरपीएफ पुणे: १ (किशोर पाटील ४४वे ) वि.वि.एक्सलन्सी हॉकी अकादमी: 0
इन्कम टॅक्स इलेव्हन पुणे: ३ (विक्रम सिंग २५ वे, एम.दानिश २९वे ; मोहम्मद शाकीर ३७वे ) वि.वि. रेल्वे लाइन बॉईज १ (कृणाल गोही ५६वे )
मुंबई रिपब्लिकन: १० (व्यंकटेश देवकर दुसरे, ३६वे, ४८वे, ६०वे; हर्ष यादव ७वे, ५८वे; विजय पिल्ले २८वे, ६०वे; करण सिंग ३८वे; लक्ष्मीकांत कावळे ४९वे) वि.वि किड्स १ (साहिल हिरे २२वे ).
महिला: एक्सलन्सी हॉकी अकादमी वि.वि एस एनबीपी कडून पुढे चाल
महत्वाच्या बातम्या –
सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या वैष्णवी आडकर, वैदेही चौधरी यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
IPL 2024 Auction । वयाच्या 19व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज 7 कोटींचा मालक