पुणे – लौकिक एफए, संगम यंग बॉईज आणि केपी इलेव्हन संघानी सहज विजय मिळवून आमदार करंडक २०२३ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर हे सामने सुरु आहेत.
राज ढमढेरेने केलेल्या तीन गोलच्या जोरावर लौकिक एफए संघाने एबीसी एफसी संघाचा ६-० असा पराभव केला. लौकिकसाठी अन्य गोल संकेत पवारने दोन, तर रोहन सुनारने एक गोल केला.केपी इलेव्हन संघाने रोमारियो, विकी परदेशी आणि अल्फ्रेड नेगलने केलेल्या गोलच्या जोरावर आर्यन्स एफसीचा ३-० असा पराभव केला. अन्य एका सामन्यात संगम यंग बॉईंजने रेंजहिल्स यंग बॉईज संघाचा १-० असा पराभव केला. एकमात्र विजयी गोल क्लिनिंग मार्शिलॉंगने केला.
निकाल –
संगम यंग बॉईज १ (क्लिनिंग मार्शिलॉंग ७वे मिनिट) वि.वि. रेंज हिल्स यंग बॉइज ०
लौकिक एफ.ए. ६ (संकेत पवार २रे, ४६वे मिनिट, राज ढमढेरे १९, ५०, ५७वे मिनिट, रोहन सुनार ४८वे मिनिट) वि.वि. एबीसी एफसी ०
केपी इलेव्हन ३ (रोमारियो नाझरेथ ३६वे, विकी परदेशी ४७वे, अल्फ्रेड नेगल ६१वे मिनिट) वि.वि. आर्यन्स एस. सी. ०
दुर्गा एस.ए.: 0, 5 (Mehul Gopal, Aman Madhurai, Mayur Waghire, Prabodh Bhosale, Neeraj Mane) वि.वि. इंद्रायणी एस.सी. 0, 4 (Jeevan Rawat, Yogesh Rawat, Makrand Hardev, Suraj Bhairat)णार निर्णय!
(MLA Cup Football. Laukik FA, Sangam Young Boys in semi-final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच