नवी दिल्ली। नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून टॉपलेस फोटो शेअर करणारी माजी मिश्र मार्शल आर्ट्सची प्रसिद्ध महिला खेळाडू जिना कारानो चांगलीच संतापली आहे. खरंतर इंस्टाग्रामने तिचे फोटो डिलीट केले आहेत. तिने शेअर केलेले फोटो इंस्टाग्राम नियमांनुसार आक्षेपार्ह होते, ज्यामुळे तिचे फोटो इंस्टाग्रामवरून काढून टाकण्यात आले आहेत.
इंस्टाग्रामकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर जिना (Gina Carano) संतापली आणि तिने ट्वीट करत हे सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. तिने लिहिले, “ती पोस्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत होती. त्यामध्ये मी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. विचित्र. मला पदवीधर झाल्यासारखं वाटतंय.”
जिनाच्या टॉपलेस फोटोवर ब्राझीलच्या जियू- जित्सू मास्टर रेंजो ग्रेसी यांनीदेखील टीका केली होती. त्यांनी लिहिले होते, “कपडे घाल. तुला हे करण्याची आवश्यकता नाही. तू खूप सुंदर महिलांपैकी एक आहेस. तुला अशाप्रकारच्या फोटोंची आवश्यकता नाही.”
So that’s what it’s like to be censored for no reason. Pic was taken down by Instagram. There’s much more important news today but that was some classic bullshit. The whole post was about freedom of expression. Violating zero rules. Ironic. Feels like I graduated. ???? Thanks Karen pic.twitter.com/hJDn4Vph49
— Gina Carano ???? (@ginacarano) June 29, 2020
जिनाने मिश्र मार्शल आर्ट्सचे ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात तिला पराभव स्विकारावा लागला आहे. जिनाने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती फास्ट अँड फ्यूरिअस ६ आणि डेडपूल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आहे.