---Advertisement---

एमएमसी, सिंहगड कॉलेजचे विजय

---Advertisement---

पुणे: मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एमएमसीओए), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या फुटबॉलमध्ये ‘एमएमसी’ने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात यश कापडीने लढतीच्या २०व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. यानंतर सिंहगड कॉलेजने भारतीय कला प्रशिक्षण संस्था संघाचा ३-१ने पराभव केला. सिंहगड कॉलेजकडून शार्दूल वरपेने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने लढतीच्या २८, ३० आणि ३७व्या मिनिटाला गोल केले. भारतीय कला संघाकडून एकमेव गोल प्रसाद काकडेने (३६ मि.) केला.

यानंतर कोल्हापूरच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाचे आव्हान ४-१ने परतवून लावले. कोल्हापूरच्या संघाकडून आर्यन खवटे (२३ मि.), अनिश पवार (३४ मि.), वेदांत खारशिंगे (३६ मि.) आणि सुजल हळदे (४० मि.) यांनी गोल केले.

मुलींच्या गटातील फुटबॉल लढतीत सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संघांतील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यानंतर वाशिंक मोरेच्या (१५ मि.) एकमेव गोलच्या जोरावर श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला १-०ने नमविले. यानंतर पिंपरी-चिंचवडच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात विजेत्या संघाकडून समीक्षा पाटीलने (१२ मि.) एकमेव गोल केला.

इतर निकाल : बास्केटबॉल मुले- डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी- २७ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- १३; डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी- २३ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- १३; ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर- ३२ वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- २४.

मुली- भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- १९ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी- ३; मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- २५ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- ४; भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- १५ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- ४.

व्हॉलिबॉल- मुले- मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-२१, २५-९; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी २५-४, २५-७.

मुली- मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-१४, २५-९; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २२-२५, २५-१८, १६-१४; डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-९, २५-९.

महत्त्वाच्या बातम्या-

हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम..! अशी कामगिरी करणारी दुसरीच महिला खेळाडू
आयपीएल 2025 मध्ये मुंबई-चेन्नई कधी भिडणार? तारखेसहित स्थळाचीही झाली घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकाइतकीच स्पर्धात्मक का? जाणून घ्या प्रमुख कारणे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---