१९ सप्टेंबरपासून युएईत इंडियन प्रीमियर लीग २०२०चे बिगूल वाजले आहे. कोविड-१९ मुळे चाहत्यांना प्रत्यक्षात स्टेडियमध्ये जाऊन सामने पाहता येत नसले, तरी टीव्ही किंवा डिस्ने हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे चाहते आयपीएलचा आनंद लुटत आहेत. या माध्यमांवर भारतातील अन्य भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन केले जाते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाने डिस्ने हॉटस्टार कंपनीला आयपीएलचे मराठी भाषेतही समालोचन करण्यात यावे, असे पत्र पाठवले आहे.
मनसेचे पदाधिकारी केतन नाईक हे याविषयी बोलताना म्हणाले की, “डिस्ने हॉटस्टार या ऍपवर इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषेत समालोचन ऐकण्याचे पर्याय आहेत. मात्र यात मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. तुमच्या ऍपवर अन्य प्रादेशिक भाषांसारखाच मराठी भाषेचा पर्यायही देण्यात यावा.”
https://twitter.com/ketannaik4/status/1318556642833764358?s=20
https://twitter.com/ketannaik4/status/1318518644268134401?s=20
https://twitter.com/ketannaik4/status/1318503712470396928?s=20
“आयपीएलचा तेरावा हंगाम संपण्यापुर्वी या ऍपवर मराठी भाषेच्या पर्यायाचा समावेश झालेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर तुम्हाला मराठीत समालोचन करताना कुठल्याही प्रकारची अडचण आली, तर आम्ही आवश्यक सहकार्य करू. तरीही तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही, तर आम्ही तुमची मनसे स्टाईलमध्ये समजूत काढू,” असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नवरीच्या हातात बॅट! पाहा नुकत्याच लग्नबंधनात अडकलेल्या महिला क्रिकेटपटूचे स्पेशल वेडिंग फोटोशूट
आयपीएल २०२०: स्वत: शाहरुख खानने दिलं चाहत्यांना ‘खास’ गिफ्ट, पाहून तुमचेही थिरकतील पाय
‘मॉर्गनची कर्णधार म्हणून झालेली निवड योग्य नाही’, दिग्गज क्रिकेटरने व्यक्त केला संताप
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू