आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरवात झाली आहे. पकिस्तान संघाने नेपाळविरुद्ध पहिल्याच सामन्यात 232 धावांनी विजय मिळवला आहे. आशिया चषक चालू होण्यापूर्वीच बऱ्याच दिवसंपासून अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंचे वक्तव्य समोर येत आहेत. 2 सप्टेंबर रोजी आशिया चषकातील सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तान संघाला विराट कोहलीपासून धोका असू शकतो. असे मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे आहे. त्याने भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा महासामना 2 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खूप धोकादायक ठरू शकतो, असा विश्वास मोहम्मद कैफला (Mohammad Kaif) आहे.
कैफ म्हणाला की, “गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात विराटची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने वेगवान फलंदीज करताना अप्रतिम खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध विराट नेहमीच आक्रमक अंदाजात खेळत असतो. तो संघाची संपुर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.”
दिग्गज खेळाडू पुढे म्हणाला की, विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या शतकामुळे तो परत फॉर्ममध्ये आला. त्यामुळे तो 2022 टी20 विश्वचषकात चांगली कामगिरी करु शकाला. विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला होता. प्रत्येक पाकिस्तानी गोलंदाजाला कुठल्या ठिकाणी गोलंदाजी करावी हे कळत नव्हते. मंग तो नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी किंवा हरिस रौफ असो.”
गेल्या वर्षी टी20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान आमने-सामने होते, तेव्हा विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची शानदार खेळी केली होती आणि अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला होता. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकवला होता. (mohamad kaif said virat kohli is dangerous batsman against pakistan)
महत्वाच्या बातम्या-
धोनीने घालवला आपल्या चिमुकल्या फॅन्ससोबत वेळ, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
बाबर-विराटच्या पहिल्या भेटीत काय घडलेल? पाकिस्तानी कर्णधारानेच केला खुलासा