पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. शनिवारी या मालिकेतील पहिला टी२० सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने ४ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिज याच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्याही खास होता.
हाफिजचा हा आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १०० वा सामना होता. हा टप्पा पार करणारा तो जगातील सहावा तर पाकिस्तानचा दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी शोएब मलिक या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा कारनामा केला होता.
जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये हाफिज आणि मलिक व्यतिरिक्त रोहित शर्मा, मार्टिन गप्टिल, ओएन मॉर्गन आणि रॉस टेलर या खेळाडूंनीही त्यांच्या कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ची२० सामने खेळण्याचा विक्रम मलिकच्या नावावर आहे. त्याने ११६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
हाफिजने पाकिस्तान संघासाठी ऑगस्ट २००६ मध्ये पहिला टी२० सामना खेळला होता. त्याने आत्तापर्यंत १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २३३६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आत्तापर्यंत ५ टी२० विश्वचषकात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारे खेळाडू –
११६ – शोएब मलिक
१११- रोहित शर्मा
१०२ – मार्टिन गप्टीस
१०२ – रॉस टेलर
१०२ – ओएन मॉर्गन
१०० – मोहम्मद हाफिज
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत
‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल
‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी