पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने दुखापतीमुळे आशिया चषकातून माघार घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी हा आशिया चषकापूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. शाहीन आफ्रिदीने माघार घेतल्यानंतर पाकिस्तानाने पर्यायी खेळाडूच्या रूपात मोहम्मद हसनैन याला संघात सामीली केले आहे. अनेकांच्या मते हसनैन आशिया चषकात पाकिस्तान संघासाठी चिंतेची बाब ठरू शकतो.
मोठ्या संघांविरुद्ध महागात पडला आहे हसनैन
मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) संघासाठी चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकतो. परंतु टी-२० क्रिकेटमधील त्याचा इकोनॉमी रेट ही चिंतेची बाब आहे. एकंदरीत पाहता त्याने या फॉरमॅटमध्ये ७.९० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहे, जी ठीकठाक आहे. मात्र मोठ्या संघांविरुद्ध खेळताना तो नेहमीच पाकिस्तानसाठी महागात पडला आहे.
वेस्ट इंडीज संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १२.२५ च्या इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची इकोनॉमी १२.५० धावा राहिले आहे. श्रीलंकन संघाविरुद्ध त्याने ९.५० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध ९, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ८ धावा प्रत्येक षटकात खर्च केल्या आहेत. झिम्बाब्वे एकमात्र संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध हसनैनची आकडेवारी चांगली म्हणता येईल.
त्याव्यतिरिक्त हसनैनची गोलंदाजी ऍक्शन ही देखील पाकिस्तानसाठी बाधा ठरू शकते. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच चुकीच्या ऍक्शनचे आरोप केले गेले होते. द हंड्रेड लीगमद्ये खेळताना हसनैनच्या ऍक्शनवर मार्कस स्टॅयनिसने प्रश्न उपस्थित केले होते. अशात संघावर हा अतिरिक्त देबाव देखील असेल. दुसरीकडे शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) मात्र विरोधी संघासाठी मोठे आव्हन ठरू शकत होता.
हसनैन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे. ऑवल इन्विसबल संघासाठी खेळतानाही हसनैनची चांगलीच धुलाई झाली. त्यान टाकेलेल्या ४ षटकात ५ विकेट्स घेतल्या, पण यादरम्यान ११.४५ च्या इकोनॉमीने धावाही खर्च केल्या. त्याची आजवरची आकडेवारी पाहता आशिया चषकात भारतीय फलंदाज देखील हसनैनची सहजासहजी धुलाई करतील, असा अंदाज बांधला जात आहे. उभय संगातील हा सामना २८ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गिलनंतर आता किशनची बॅट तळपली! तिसऱ्या वनडेत झळकावले तडफदार अर्धशतक
आशिया कप क्वालिफायर्समध्येच थरार! नवखी कुवेत पडली युएईला भारी
पाकिस्तानी गोलंदाजाचा स्विंग बघून भल्याभल्यांची बॅट थंडावेल! तुम्हीही एकदा पाहाच