भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहे, जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा याच्या नावाचाही समावेश होतो. भारतीय संघाकडून कसोटी खेळणारा पुजारा धांगडधिंगा करण्यापासून खूप दूर असतो. विशेष बाब म्हणजे, तो शतक झळकावल्यानंतरही शांततेत सेलिब्रेशन करतो. या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी संघाबाहेर केलेल्या पुजाराने आता दमदार पुनरागमन केले आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शतकही झळकावले, सर्वाधिक धावाही केल्या आणि मालिकावीर पुरस्कारही नावावर केला. अशात माजी भारतीय खेळाडूने त्याला सल्ला दिला आहे, ज्यामुळे पुजाराही जोरजोरात हसू लागला.
माजी भारतीय खेळाडूचा पुजाराला अजब सल्ला
भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला सल्ला दिला. हा असा सल्ला होता, ज्यामुळे पुजाराही जोरजोरात हसू लागला. सामन्यानंतर पुजाराशी बोलताना कैफ म्हणाला की, “शतक केल्यानंतर तू खूपच शांततेत सेलिब्रेशन करतो. काहीतरी कर भावा. बॅट फिरव, अशाप्रकारे पंच कर. कारण, हेच टीव्हीवर दाखवले जाते आणि लोक आठवणीत ठेवतील की, पुजाराने धावा केल्या होत्या. नाहीतर तुझ्या स्ट्राईक रेट आणि तू किती सावकाश खेळतो, याबद्दल चर्चा होईल.”
पुढे बोलताना कैफ म्हणाला की, “भावा काहीतरी कर. ही ट्रॉफी मिळाली आहे ना, त्याची पप्पी घे, किस कर. सोशल मीडियावर टाक आणि लोकांना सांग की, तू चांगला खेळला आहेस आणि मालिकावीराचा पुरस्कार जिंकण्यासाठी दमदार पुनरागमन केले आहे. प्लीज, पुजारा.”
Player of the Series @cheteshwar1 talks us through the match and how he is constantly trying to improve his batting skills 🏏 💬#BANvIND #SonySportsNetwork pic.twitter.com/d6TV130qsf
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 25, 2022
काय म्हणाला पुजारा?
यावर बोलताना पुजारा त्याचे हसू रोखू शकत नव्हता. त्याने म्हटले की, “मी ज्या धावा करत आहे, त्या माझ्यासाठी भरपूर आहेत. बॅट आहे, जी जास्त बोलते. सेलिब्रेशन करण्यापेक्षा जास्त धावा करणे चांगले आहे. तसेच, संघासाठी योगदान देऊ शकतो, ते महत्त्वाचे आहे.”
पुजाराची कसोटी मालिकेतील कामगिरी
बांगलादेश विरुद्ध भारत (Bangladesh vs India) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा याने 74च्या सरासरीने 222 धावा चोपल्या. त्याने पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. हे त्याचे जानेवारी 2019नंतरचे पहिले शतक होते. म्हणजेच त्याने 1443 दिवसांनंतर शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. (mohammad kaif put hilarious request in front of cricketer cheteshwar pujara see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या 35 वर्षीय पठ्ठ्याचे 4 वर्षांनंतर पुनरागमन, मैदानावर उतरताच दाखवला दम; रिझवानची जागा धोक्यात
डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘हा’ खेळाडू महत्वाचा, भारतीय दिग्गजाचा दावा