रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. भारताने दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलिया संघाचा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जडेजा सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतोय. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने आपण जडेजाला सहा-सात वर्षांपूर्वी दिलेला सल्ला त्याने न ऐकून चांगले केल्याचे म्हटले.
जडेजा याने या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 21 षटके गोलंदाजी करताना 68 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 12.1 षटकात 47 धावा खर्च करत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. नागपूर येथील पहिल्या कसोटीतही त्याला सात बळी घेण्यात यश आलेले.
याच मुद्द्यावर बोलताना भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व समलोचक मोहम्मद कैफ याने एक खुलासा केला. आपण जडेजाला दिलेला एक सल्ला त्याने न मानून योग्य केल्याचे त्याने म्हटले. कैफने सांगितले,
“सहा सात वर्षांपूर्वी मी गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक असताना जडेजाला एक सल्ला दिलेला. कॅरम बॉल आणि साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी करण्याबाबत त्याला मी म्हटलेले. मात्र, त्याने नकार देताना म्हटले होते की, असं केल्यास मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करू शकणार नाही. आता मला आनंद आहे की, त्याने माझा सल्ला ऐकला नाही.”
आयपीएल 2016 व 2017 मध्ये तेव्हा दोन वर्षांसाठी गुजरात लायन्स हा संघ आयपीएल मध्ये सहभागी झालेला. त्यावेळी कैफ संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होता. रैनाच्या अनुपस्थितीत जडेजाने काही सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते.
(Mohammad Kaif Reveal 7 Year Old Incident About Jadeja Bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
दिल्ली कसोटी गमावताच पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडला भारत! वाचा संपूर्ण प्रकरण