दोहा येथे सध्या एलएलसी मास्टर्स ही निवृत्त क्रिकेटपटूंची लीग पार पडत आहे. एशिया लायन्स विरुद्ध वर्ल्ड जेंट्स असा अंतिम सामना रविवारी (19 मार्च) खेळला जाईल. भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा संघ असलेल्या इंडिया महाराजा संघाला अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. या सामन्यात खेळताना इंडिया महाराजा संघाचा सदस्य मोहम्मद कैफ याने एक अफलातून झेल टिपला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Vintage Kaif! 🔥@MohammadKaif #LegendsLeagueCricket #YahanSabBossHain pic.twitter.com/9Gc4qO5Cyl
— FanCode (@FanCode) March 18, 2023
इंडिया महाराजा विरूद्ध एशिया लायन्स यांच्यातील अखेरचा साखळी सामना शनिवारी (18 मार्च) खेळला गेला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना कैफ याने एक नेत्रदीपक झेल टिपला. एशिया लायन्स संघाच्या डावातील नवव्या षटकात त्याने हा झेल घेतला. एशिया लायन्स संघाची सलामी जोडी उपुल थरंगा व तिलकरत्ने दिलशान यांनी 83 धावांची भागीदारी केली होती. अर्धशतक करून खेळत असलेल्या थरंगा याने एक्स्ट्रा कव्हरमधून चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कैफने आपल्या उजव्या बाजूला झेपावत एका हातात जबरदस्त झेल घेतला. यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या खेळाच्या दिवसांची आठवण झाली. कैफ याला आजवरच्या भारतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानले जाते. खेळाडू म्हणून खेळत असताना त्याने अनेक अशक्यप्राय झेल टिपत सामन्याचे चित्र पालटले होते.
सदर सामन्याचा विचार केला गेल्यास, एशिया लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 191 धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया महाराजा संघाच्या फलंदाजांना अपयश आले. एशिया लायन्सच्या गोलंदाजांपुढे इंडिया महाराजाचा डाव 106 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा इंडिया महाराजा संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून वंचित राहिला.
(Mohammad Kaif Take Stunning Catch In LLC Masters For India Maharaja)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन महिन्यांतच टीम इंडियाने पाहिले अर्श आणि फर्श! ऑस्ट्रेलियाने सोपवली वनडे इतिहासातील सर्वात मोठी हार
मार्शसमोर भारतीय गोलंदाज फेलच! आजवर वनडेत नेहमी केलीये धुलाई, पाहा ही आकडेवारी