इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळला गेला. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने विजय मिळवून हंगामाची विजयी अखेर केली. मुंबईने या सामन्यात ४२ धावांनी विजय मिळवला. हैदराबादसाठी आयपीएलच्या उत्तरार्धातील पहिला सामना खेळणाऱ्या अष्टपैलू मोहम्मद नबी याने या सामन्यात एक नवा आयपीएल विक्रम केला.
नबीचा नवा विक्रम
अफगाणिस्तानचा सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या मोहम्मद नबी याने आयपीएल उत्तरार्धातील आज आपला पहिला सामना खेळला. त्याने हैदराबादसाठी पहिले षटक देखील टाकले. त्याच्या तीन षटकांमध्ये ३३ धावा निघाल्या. मात्र, नबीने क्षेत्ररक्षण करताना एका नव्या आयपीएल विक्रमाला गवसणी घातली. त्याने क्षेत्ररक्षण करताना तब्बल पाच झेल घेतले. त्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जिमी निशाम, कृणाल पंड्या व नॅथन कुल्टर-नाईल यांचे झेल टिपले.
हे मैदानावरील कोणत्याही क्षेत्ररक्षकाने आयपीएलमध्ये एका डावामध्ये टिपलेले सर्वाधिक झेल आहेत. यापूर्वी अशी कामगिरी आयपीएलमध्ये एकदा झाली आहे. मात्र, ती कामगिरी एका यष्टीरक्षकाकडून झालेली. आयपीएल २०११ मध्ये डेक्कन चार्जर्स संघासाठी खेळताना कुमार संगकाराने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध ही कामगिरी केलेली.
मुंबईचा मोठा विजय
अबुधाबी येथील या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना धावांची अक्षरश: लयलूट केली. ईशान किशनने ८४ तर, सूर्यकुमार यादवने ८२ धावा चोपल्या. हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक चार बळी मिळविले. प्रत्युत्तरात, अभिषेक शर्मा व जेसन रॉय यांनी ५.२ षटकात ६४ धावांची सलामी दिली. या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या मनीष पांडे याने नाबाद ६९ धावा ठोकत. संघाला १९३ धावांची मजल मारून दिली. या सामन्यात हैदराबादने ६६ भावा बनवितात मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ईशान-रोहितच्या वादळात हैदराबाद भुईसपाट; सलीमी जोडीने नवा विक्रम केला प्रस्थापित
वॉर्नरने घेतला हैदराबादच्या चाहत्यांचा निरोप, लिहिला भावूक संदेश
टी२० विश्वचषकाच्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता; विराट-रोहित बीसीसीआयच्या बैठकीत होणार सामील