पाकिस्तानचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने हाँगकाँगविरुद्धच्या आशिया चषक 2022 मधील शेवटच्या साखळी फेरी सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने झंझावाती अर्धशतक करत पाकिस्तानला 193 धावांपर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी हाँगकाँगला 38 धावांवरच रोखले आणि 155 धावांच्या फरकाने सामना जिंकला. यासह पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश केला असून आता पुन्हा एकदा भारताविरुद्ध त्यांचा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याबद्दल रिझवानने प्रतिक्रिया दिली आहे.
रिझवान (Mohammad Rizwan) हाँगकाँगविरुद्धच्या (PAKvsHK) सामन्यानंतर म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) एक असा सामना आहे, ज्याची नेहमीच प्रतिक्षा असते. पाकिस्तानचे खेळाडू पुन्हा एकदा भारताशी भिडण्यासाठी उत्सुक असल्याने त्याने म्हटले आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर रिझवान म्हणाला की, “सर्वांना हे माहिती आहे की, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडतात, तेव्हा नेहमीच दबावाची परिस्थिती असते. संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहात असतो. भारत आणि पाकिस्तान संघात होणारा सामना अंतिम सामन्यासारखा असतो. मला वाटते की, आम्ही शक्य तितका हा सामना सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास आता खूप उंचावला आहे. आम्ही आता कोणत्याही प्रतिद्वंद्वींचा सामना करायला सज्ज आहोत.”
भारताने पाकिस्तानला दाखवलेय आस्मान
दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वीही भिडंत झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघ 28 ऑगस्टला दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावांवर गुंडाळला गेला होता. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर पाकिस्तानचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.
या पराभवानंतर आता 4 सप्टेंबरला पुन्हा दुबईच्या मैदानावर हे संघ भिडणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध मागील पराभवाचा वचपा काढत अंतिम सामन्यातील आपला दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशात कोणता संघ हा सामना जिंकतो, हे पाहाणे रोमांचक ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मिचेल स्टार्कने टाकला ‘तो’ चेंडू आणि पाकिस्तानच्या दिग्गजाचा 23 वर्ष जुना विक्रम मोडीत
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
अखेर वाद निवळला! दुखापतग्रस्त जड्डूसाठी सीएसकेने केले खास ट्विट