गुरुवारपासून (दि. 9 मार्च) अहमदाबाद येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चिकाटीने फलंदाजी करत भारतीय संघाला सहजासहजी यश मिळू दिले नाही. मात्र, अखेरच्या सत्रात मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्ब याला एका सुंदर चेंडूवर त्रिफळाचीत केले.
ऐतिहासिक असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी हेड व ख्वाजा यांनी शानदार 61 धावांची सलामी दिली. दुसऱ्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 149 कशी होती. मात्र, अखेरच्या सत्रात जडेजाने पहिल्यांदा स्मिथ याला बाद करण्यात यश मिळवले. त्यानंतर मागील दोन कसोटी सामन्यात उपयुक्त योगदान दिलेल्या पीटर हॅंड्सकॉम्ब याने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा यशस्वी सामना केला.
As good as it gets! 🔥🔥@MdShami11 uproots the off-stump to dismiss Handscomb for 17! 👏👏
Australia 170/4.
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/2hXFYhvslW
— BCCI (@BCCI) March 9, 2023
वैयक्तिक 17 धावांवर हॅंड्सकॉम्ब याला मोहम्मद शमी याने त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियन डावातील 71 वे षटक टाकताना चौथ्या चेंडूवर त्याने हॅंड्सकॉम्बची दांडी उडवली. विशेष म्हणजे त्यावेळी यष्टी तीन पलट्या खात बाजूला पडली. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला.
तत्पूर्वी, मालिकेतील या अखेरच्या सामन्यासाठी सकाळच्या सत्रात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हजेरी लावली. उभय कर्णधारांना एक खास कॅप देऊन देखील सन्मानित केले गेले. भारतीय संघाने मालिकेतील नागपूर व दिल्ली येथे झालेले पहिले दोन सामने आपल्या नावे केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत इंदोर कसोटीत विजय मिळवला होता. आता अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, जागतिक कसोटी क्रमवारीत देखील भारताला पहिल्या स्थानी जाण्याची संधी आहे.
(Mohammad Shami Clean Bold Peter Handscomb With Excellent Delevery In Ahmedabad Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video