आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झाला.
या सामन्यात पंजाबकडून मोहम्मद शमीने दुसरे षटक टाकले. शमी हा एक अतिशय चलाख व हमखास विकेट मिळवून देणारा गोलंदाज समजला जातो. असे असताना याच शमीच्या नावावर आयपीएलमध्ये एक अतिशय खराब विक्रम आहे.
आयपीएलमध्ये तब्बल ३५ गोलंदाजांनी १५० किंवा अधिक षटके गोलंदाजी केली आहे. या ३५ गोलंदाजांमध्ये शमीचाही समावेश आहे. परंतू गोलंदाजांच्या दृष्टीने सरासरी व इकॉनॉमी अतिशय महत्त्वाची समजली जाते.
यातच शमीच्या नावावर अतिशय खराब विक्रम आहे. शमी आयपीएलमध्ये या ३५ गोलंजांत सर्वात खराब सरासरीने अर्थात ३८.७०ने व ८.९५च्या इकॉनॉमीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत. अन्य कोणत्याही गोलंदाजांने अशा खराब सरासरी व इकॉनॉमीने गोलंदाजी केलेली नाही.
असे असले तरी यावर्षी शमीकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या पंजाब संघातील तोच सर्वात महत्त्वाचा व अनुभवी गोलंदाज आहे.