भारत आणि न्यूझीलंड संघ विश्वचषकात रविवारी (22 ऑक्टोबर) आमने सामने आहेत. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 273 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. एकट्या मोहम्मद शमी याने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. विश्वचषक सामन्यांमध्ये दोन वेळा विकेट्सचे पंचक घेणारा शमी भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
वनडे विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या सहा गोलंदाजांनी विकेट्सचे पंचक म्हणजे एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. दिग्गजाच्या या यादीत मोहम्मद शमी (Mohammad Shami) सर्वात नवखा म्हणता येईल. त्याने 2019 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात 69 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता शमी दोन वेळा विश्वचषक सामन्यात पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.
विश्वचषक सामन्यात भारतासाठी पाच विकेट्स घेणारे गोलंदाज
5/43 – कपिल देव विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1983
5/31 – रॉबिन सिंग विरुद्ध श्रीलंका, 1999
5/27 – वेंकटेश प्रसाद विरुद्ध पाकिस्तान, 1999
6/23 – आशिया नेहरा विरुद्ध इंग्लंड, 2003
5/31 – युवराज सिंग विरुद्ध आयरलँड्स, 2011
5/69 – मोहम्मद शमी विरुद्ध इंग्लंड, 2019
5/54 – मोहम्मद शमी विरुद्ध न्यूझीलंड, 2023
(Mohammad Shami is the only bowler to take five wickets twice in World Cup matches for India)
एकंदरीत विचार केला, तर विश्वचषकात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी मिचेल स्टार्क याने केली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गजाने आतापर्यंत तीन विश्वचषक सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत.
विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेणारे गोलंदाज
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 3
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 2
मोहम्मद शमी (भारत) – 2*
मुस्तफिझूर रहमान (बांगलादेश) – 2
शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) – 2
शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान) – 2
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने डावातील शेवटच्या चेंडूवर शेवटची विकेट गमावली. डॅरिल मिचेल याने सर्वाधिक 130 धावांची खेळी केली. रचिन रविंद्र यानेही 75 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. भारतासाठी शमीव्यतिरिक्त कुलदीप यादव याने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान