भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. 2018 मध्ये शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप केले आणि त्याच्यासोबतचे नाते तोडले. यानंतर शमी आपली मुलगी आयराला भेटण्यासाठी आतुर झाला होता. दरम्यान शमी आपल्या मुलीला भेटल्यानंतर खूप भावूक झाला आणि तिला मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शमी आपल्या मुलीला भेटल्यानंतर खूप भावूक दिसत होता. वर्षांनंतर आपल्या मुलीला भेटतानाचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वडिलांना भेटल्यानंतर आयराही खूप आनंदी दिसत होती. बाप-लेकीने मॉलमध्ये देखील खूप शॉपिंग केली. मुलीची आठवण काढताना शमी अनेकदा कॅमेऱ्यात उदास दिसत होता. त्याची पत्नी त्याला मुलीला भेटू देत नाही, असेही त्याने नमूद केले होते. मात्र, आता वर्षांनंतर आपल्या मुलीला पाहून शमीच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत होते.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करताना शमीने लिहिले की, “जेव्हा मी तिला खूप दिवसांनी पाहिले तेव्हा वेळ थांबला. मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की ते शब्दात व्यक्त करता येत नाही बेबो.”
मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 64 कसोटी सामन्यात त्याने 27.11च्या सरासरीने 229 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याने 6 वेळा फायफर लगावला आहे. 101 एकदिवसीय सामन्यात शमीने 195 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 23.38 आह. 23 टी20 सामन्यात त्याने 24 घेतल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; विजयानंतर गंभीरने कोहलीला मारली मिठी! VIDEO व्हायरल
IND vs BAN; ‘या’ 3 स्टार खेळाडूंचे भारताच्या टी20 संघात होणार पदार्पण?
IND vs BAN; विजयानंतर बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला कोहलीने गिफ्ट केली बॅट