भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आशिया चषकाच्या संघात निवड झाली नाही आणि त्यानंतर सातत्याने त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे, माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरेने म्हटले आहे की शमीची आशिया चषकासाठी निवड झाली नसली तरी तो टी-२० विश्वचषक संघाचा भाग नक्कीच असेल.
किरण मोरे यांच्या मते, आशिया कप संघात आवेश खान आणि अर्शदीप सिंग या गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे, जेणेकरून बॅकअप तयार करता येईल. त्यांच्या मते, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बॅकअप आवडतो आणि त्यामुळेच शमीऐवजी या गोलंदाजांची आशिया कपसाठी निवड करण्यात आली.
मोहम्मद शमीशिवाय संघ टी-२० वर्ल्डकपला जाणार नाही – किरण मोरे
किरण मोरे यांनी स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात सांगितले की, ‘हार्दिक पांड्याने ज्या प्रकारे पुनरागमन केले ते खूपच नेत्रदीपक आहे. आता तो १४० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करत आहे. कर्णधाराला त्याच्यासारख्या खेळाडूची गरज असते जो धावा करू शकतो, विकेट घेऊ शकतो आणि क्षेत्ररक्षणातही सतर्क असतो. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा संघ मोहम्मद शमीशिवाय टी-२० विश्वचषक खेळायला जाणार नाही. निवड झालेल्या गोलंदाजांना विश्वचषकासाठी बॅकअप म्हणून तयार केले जात आहे.
तो पुढे म्हणाला, ‘शमी नक्कीच विश्वचषकाचा भाग व्हायला हवा. राहुल द्रविडची प्रक्रिया आहे आणि त्याला बॅकअप घेणे आवडते. वर्ल्डकपमध्ये एखादा गोलंदाज दुखापतीचा बळी ठरला, तर आवेश खानसारखा गोलंदाज बॅकअप म्हणून उपस्थित असेल. मला बुमराहच्या दुखापतीबद्दल माहिती नाही पण टी-२० विश्वचषकाचा प्रश्न आहे तोपर्यंत बुमराह आणि शमी हे दोघेही टी-२० विश्वचषक संघाचा भाग असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एशिया कपच्या बाहेर भारताच्या ‘या’ सलामीवीराची टी२० लीगमध्ये विस्फोटक खेळी
रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
एशिया कपमध्ये टीम इंडियासाठी पाकिस्तान नाही तर ‘हा’ संघ ठरतोयं डेंजर