ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवणारा खेळाडू म्हणजे, ‘मोहम्मद सिराज’. आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला २-१ च्या फरकाने कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले. यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा संपवून गुरुवारी (२१ जानेवारी) सर्व भारतीय खेळाडू स्वदेशी परतले आहेत. इतर खेळाडूंप्रमाणे सिराजही नुकताच हैदराबादमध्ये पोहोचला आहे.
अनेक भारतीय खेळाडूंनी सहा-सात महिन्यांनंतर मायदेशी परतल्यामुळे विमानतळावरुन सरळ घरचा रस्ता धरला. परंतु सिराज हैदराबादच्या विमानतळावर उतरल्यानंतर घरी न जाता थेट आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचला. यासह सिराजने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. स्मशानभूमीत आपल्या वडीलांच्या थडग्यावर (कबर) फुले वाहत प्रार्थना करतानाचा सिराजचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचून आठवडाही झाला नव्हता की, सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडली. तरीही आपल्या काळजावर दगड ठेवत सिराजने भारतात न परतण्याचा कठीण निर्णय घेतला. सिराजच्या वडीलांचे स्वप्न होते की, त्यांच्या मुलाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करावे. मात्र आपल्या मुलाला भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
सिरजचा भाऊ मोहम्मद इस्माइल याने आपल्या वडिलांच्या स्वप्नाविषयी बोलताना सांगितले की, “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की सिराजने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळावे. त्यांना सिराजला भारतीय संघाच्या निळ्या आणि पांढऱ्या जर्सीत पाहायचे होते. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. परंतु त्यांना सिराजला भारताकडून खेळताना पाहण्याचे सुख लाभले नाही. सिराजने आपल्या वडिलांचे स्वप्न केल्याचा आम्हाला अभिमान आहे. सोबतच आम्हाला याचा आनंद आहे की, त्याने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपुर्ण योगदान दिले.”
https://twitter.com/iamasjadraza7/status/1352175524710240256?s=20
सिराजने भारतीय संघाच्या कसोटी विजयात उचलला महत्त्वाचा वाटा
२६ वर्षीय सिराजने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातून भारतीय कसोटी संघात पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील कसोटी सामन्यात खेळताना सिराजने सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या फाइव्ह विकेट हॉलचा (एका डावात पाच विकेट) समावेश आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या निर्णायक कसोटी सामन्यात त्याने हा भीमपराक्रम केला होता. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ ३ विकेट्सने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
“ब्रिस्बेन कसोटीबाबत असलेला अति आत्मविश्वास नडला”, माजी फलंदाजाने घेतली क्रिकेट ऑस्ट्रेलियाची शाळा
मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का मलिंगाचा आयपीएलला रामराम, नावावर आहेत एकाहून एक जबरा विक्रम