सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला. यासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु गोलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजने असे काहीतरी कृत्य केले. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचे आव्हान होते. तर चौथ्या दिवस (२९ डिसेंबर) अखेर दक्षिण आफ्रिका संघाला ४ बाद ९४ धावा करण्यात यश आले होते. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु कर्णधार डीन एल्गरला वगळता कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी हा सामना दक्षिण आफ्रिका संघाला गमवावा लागला.
तर झाले असे की, सामन्याच्या पाचव्या दिवशी (३० डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी ६२ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. त्यावेळी मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूवर टेंबा बावूमाने रक्षात्मक शॉट खेळला आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. मोहम्मद सिराजने पटकन चेंडू उचलला आणि थेट टेंबा बावुमाच्या (Temba Bavuma) दिशेने फेकला. चेंडू त्याच्या घोट्याला लागला आणि तो वेदनेने ओरडू लागला. त्यानंतर मोहम्मद सिराजने माफी मागितली होती.
मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, मोहम्मद सिराजने त्याला मुद्दाम चेंडू फेकून मारला. त्यानंतर फिजियो मैदानात आले आणि पाहणी केली. त्यानंतर तो पुन्हा एकदा फलंदाजी करायला आला. त्याने नाबाद ३५ धावांची खेळी केली.
https://twitter.com/shitpostest/status/1476489986308390914?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1476489986308390914%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-mohammad-siraj-video-viral-when-he-hit-temba-bavuma-ankle-watch-centurion-test-ind-vs-sa-3927922.html
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या १९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय संघाला १३० धावांची मोठी आघाडी मिळाली होती. ही आघाडी घेत भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ११३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच
हे नक्की पाहा