fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वनडेत क्रिकेटमध्ये एका षटकात १७ चेंडू टाकणारा गोलंदाज

माॅडर्न क्रिकेटमध्ये एक षटक अर्थात ओव्हर ही ६ चेंडूंची असते. पुर्वी काही सामन्यांत ४ ते ८ चेंडूपर्यंत षटक टाकलं जात असे. परंतु आता सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये ६ चेंडूंच टाकले जातात.

गोलंदाज कधी कधी नो बाॅल किंवा वाईड बाॅल यामुळे जास्त चेंडूंही षटकात टाकतात. परंतु कोणत्याही गोलंदाजाला षटक पुर्ण करण्यासाठी अधिकृत ६ चेंडू टाकावे लागतात.

वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने एक षटक पुर्ण करण्यासाठी तब्बल १७ चेंडू टाकले होते. हा आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम आहे.

आशिया कप २००४ला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे सामन्यात त्याने हा नकोसा कारनामा केला होता. सामी एक चांगला गोलंदाज म्हणून जगात विख्यात होता. परंतु त्याला या अशा नकोशा विक्रमाला सामोरे जावे लागले होते. Mohammed Sami – 17 balls longest overs bowled in cricket history.

कोलंबो येथे २९ जुलै २००४ रोजी बांगलादेशचा कर्णधार हबीबुल बाशरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सामन्यात गोलंदाजीची सुरुवात सामीने केली व पहिल्याच षटकात एकही धाव न देता मोहम्मद अश्रफऊलला तंबूत पाठवले. त्यानंतर दुसरे षटक शब्बीर अहमदने टाकल्यानंतर तिसरे षटकं टाकण्यासाठी शमीने धाव घेतली आणि याच षटकात नकोसा विक्रम केला.

वाईड, ४, २, नो बाॅल, वाईड, १, नो बाॅल, वाईड, वाईड, ०, वाईज, नो बाॅल, वाईड, वाईज, नो बाॅल, ४ असे ते षटक होते. यात त्याने ७ वाईड व ४ नो बाॅल टाकले होते. त्याने या षटकात २२ धावा दिल्या होत्या.

असे असले तरी या सामन्यात त्याने ८.२ षटकांत केवळ ३८ धावा दिल्या होत्या व त्यात २ विकेट्स घेतल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

-हे आहे जगातील ५ महान क्रिकेटपटू, यात दोन आहेत भारतीय

-धोनीला स्थान न मिळालेल्या या संघात दोन भारतीयांचा समावेश

-या कारणामुळे वर्ल्डकप फायनलला धोनी आला होता युवराज आधी

You might also like