भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या विश्रांतीवर आहे. शमी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे आणि त्याला मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. शमीने सुट्टीवर असताना दररोज त्याच्या चाहत्यांसाठी काही नवीन आणि खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे. आता त्याने कू ऍपवर मासे पकडतानाचा (फिशिंग) एक खास फोटो शेअर केला आहे. शमीने शेअर केलेल्या या पोस्टमधून, तो त्याला मिळालेल्या विश्रांतीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. चाहते त्याच्या या पोस्टवर व्यक्त होत आहेत.
शमीने मासे पकडताना कू एपवर शेअरे केकेल्या या पोस्टमध्ये तो समुद्राच्या मध्ये एका बोटीत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये शमीच्या एका हातात मासे पकडण्यासाठी वापरला जाणारा बांबू (फिशिंग रॉड) दिसत आहे, तर दुसऱ्या हातात त्याने एक मोठा मासा पकडलेला दिसत आहे. शमीने या पोस्टमध्ये एक हाफ स्वेटर घातला आहे आणि डोक्यात काळ्या रंगाची टोपी देखील आहे.
त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “फिशिंग.” चाहत्यांना शमीची ही पोस्ट चांगलीच भावल्याचे दिसत आहे. चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अनेकांनी शमीला प्रश्न विचारला आहे की, त्याने पकडलेला हा मासा कोणत्या जातीचा आहे?
येथे पाहा पोस्ट-
https://www.kooapp.com/koo/mdshami11/e1c595a2-2181-407d-bacc-35dacc005297
दरम्यान, भारतीय संघ मागच्या काही महिन्यांपासून सतत एकापाठोपाठ एक मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ टी-२० विश्वचषकात खेळला आणि खेळाडू थकलेले असल्यामुळे संघाला विश्वचषकात अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. विश्वचषकानंतर काही दिवसातच लगेच भारत आणि न्यूजीलंड यांच्या टी-२० आणि कसोटी मालिकेला सुरुवात झाली. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारतीय संघाला काही महत्वाचे दौरे करायचे आहेत, त्यामुळे संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली आहे. शमीचाही विश्रांती मिळालेल्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये सहभाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेंटलमन गेम’चे केले तीन तेरा!! लाईव्ह सामन्यात चाहरला संताप अनावर, पंचांशी भिडला; मग आपटला चष्मा
भर सामन्यात फलंदाजाने हेल्मेटला मारली लाथ, लज्जास्पद कृती पाहून भडकले पंच अन् खेळाडू
भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटीदरम्यान प्रेक्षकांनी दिले ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, व्हिडिओ व्हायरल