fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉकडाऊनमध्ये कोच रवी शास्त्री यांची शमीकडे ‘अजब’ मागणी

Mohammed Shami surprises coach Ravi Shastri with mutton and kheer on Eid

सोलापूर । कोरोना व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जगभरात सोमवारी ईद साजरी करण्यात आली. क्रिकेट जगतातील सर्व दिग्गजांसह भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शास्त्री यांनी त्यांचा हा संदेश खासकरून मोहम्मद शमी यांना टॅग केला आणि त्याला ख‍ायच्या शेवयांची मागणी केली आहे. शमीने प्रशिक्षक शास्त्री यांच्या ट्विटला तात्काळ त्याला उत्तर दिले.

शास्त्रींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात आनंद मिळो आणि सदृढ आरोग्य लाभो. तसेच शमीला त्यांनी शेवया कुठे आहेत? असेही विचारले. मोहम्मद शमीने या ट्विटला तात्काळ उत्तर देत लिहिले की, रवी भाई शेवया आणि मटण बिर्याणी कुरिअर करण्यात आली आहे. काही वेळातच ते तुमच्या जवळ पोहचेल.

रवी शास्त्री यांनी पुन्हा ट्विट करत लिहले की, लॉक डाउन संपल्यानंतर आपण सर्वजन मिळून खाऊया. मला माहित आहे संपूर्ण संघ या शेवयांची वाट पाहत आहे.

माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने देखील ईदच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. इरफानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण आणि वडील संपूर्ण देशाला ईदच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच हरभजन सिंग आणि समालोचक हर्षा भोगले यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मस्जिद सारखे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आले आहेत. मुस्लिम धर्मगुरूंनी लोकांना घरीच ईदची नमाज अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पाकिस्तानचा हा खेळाडू शाहिद आफ्रिदीवर भडकला, बोलताना जरा…

-टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल

-…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

You might also like