रविवार रोजी (२५ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविंद्र जडेजा नावाचे वादळ घोंगावले होते. या अष्टपैलू क्रिकेटपटूने फलंदाजी, गोलंदाज अन् क्षेत्ररक्षणात विलक्षण कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याचा रोमांच द्विगुणीत केला. या सामन्यादरम्यान जडेजा आणि बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात एक प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. सिराजने जडेजाला भर सामन्यात घाबरवण्याचा प्रयत्न केले असतानाचा हा प्रसंग आहे.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करत असलेला चेन्नई संघ १८ षटकांनंतर ४ बाद १४५ धावा अशा स्थितीत होता. जडेजा आणि कर्णधार एमएस धोनी मैदानावर होते. यावेळी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज सिराजला डावातील अठरावे षटक टाकण्यासाठी पाठवले.
सिराजने षटकातील दुसरा चेंडू फुल टॉस टाकला, ज्यावर जडेजाने हलकासा शॉट मारला. त्या शॉटचा चेंडू क्रिजच्या आतच राहिला. तरीही क्रिजवरील सीमारेषा सोडून पुढे आलेला जडेजा सिराजकडे एकटक पाहत राहिला. मग सिराजने मागे वळून चेंडू घेतला आणि यष्टीवर चेंडू मारत जडेजाला धावबाद करण्याची भिती दाखवली. हे पाहून लगेचच जडेजा स्ट्राईकच्या दिशेने पळाला. खरे तर, यावेळी सिराज आणि जडेजा एकमेकांची मजा घेत होते.
https://twitter.com/lodulalit001/status/1386286296725790737?s=20
सिराजच्या या षटकात जडेजा-धोनीने एका चौकारासह केवळ ९ धावा जमवल्या. परंतु पुढील विसावे षटक अतिशय बेंगलोरसाठी अतिशय महागडे ठरले. पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी असलेल्या हर्षल पटेलला जडेजाने चोप चोपले. ५ षटकार, एक चौकार, २ धावा आणि नो बॉलची एक जास्तीची धाव असे मिळून एकूण ३७ धावा या षटकात चेन्नईच्या खात्यात नोंद झाल्या. यासह प्रतिस्पर्धी बेंगलोरला १९२ धावांचे मोठे आव्हान देत त्यांनी ६९ धावांनी सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या आनंदावर पसरलं दु:खाचं सावट, सीएसकेतील ‘या’ प्रमुख सदस्याची मालवली प्राणज्योत
शेवटच्या षटकात गगनचुंबी षटकार मारताचं जड्डूने पत्नीला दिली ‘फ्लाइंग किस’, फोटो तूफान व्हायरल
धोनीने जडेजाला ‘तो’ सल्ला दिला नसता, तर त्याने विसाव्या षटकात ३७ धावा चोपल्याच नसत्या!