पुणे, 2 सप्टेंबर 2023 ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात मोहिल ठाकुर याने तर, मुलींच्या गटात स्पृहा बोरगांवकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी क्लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित मोहिल ठाकूरने तिसऱ्या मानांकित एल्विस टॉमचा 04-11, 11-04, 11-09,11-02 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मोहिल हा सीएम इंटरनॅशनल शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून इंडीया खेलेगा अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतो. याआधीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित मोहिल ठाकूरने चौथ्या मानांकित वरदान कोलतेचा 06-11, 11-05, 09-11, 11-02, 11-09 असा तर, तिसऱ्या मानांकित एल्विस टॉमने रणवीर निकमचा 07-11, 11-09, 11-04, 11-07 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत स्पृहा बोरगांवकर हिने दुसऱ्या मानांकित स्पृहा गुजरचा11-09, 07-11, 11-08, 08-11, 11-08 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पृहा ही सिंबायोसिस शाळेत शिकत असून चॅम्पियन टेबल टेनिस अकादमी मध्ये प्रशिक्षक शंख नील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.याआधीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित स्पृहा गुजरने तिसऱ्या मानांकित अहाना गोडबोलेचा 12-10, 09-11, 11-08, 11-02 असा तर, चौथ्या मानांकित स्पृहा बोरगावकरने अव्वल मानांकित शरण्या प्रधानचा 11-03,11-13,11-08,11-08 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित राधिका सकपाळने अव्वल मानांकित धनश्री पवारचा 03-11,11-09,11-06,12-10 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चौथ्या मानांकित सई कुलकर्णीने तितिक्षा पवारला11-08,11-06,11-01 असे नमविले. मुलांच्या गटात पाचव्या मानांकित नील मुळ्येने चौथ्या मानांकित आदित्य जोरीचा 11-05, 03-11, 11-07, 11-07 असा तर, बिगर मानांकित इशान खांडेकरने तिसऱ्या मानांकित कौस्तुभ गिरगावकरचा 10-12,12-10,11-8,12-10 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
मोहिल ठाकूर(1) वि.वि.वरदान कोलते(4)06-11, 11-05, 09-11, 11-02, 11-09;
एल्विस टॉम(3) वि.वि.रणवीर निकम 07-11, 11-09, 11-04, 11-07;
अंतिम फेरी: मोहिल ठाकूर(1)वि.वि.एल्विस टॉम(3) 04-11, 11-04, 11-09,11-02;
11 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
स्पृहा बोरगावकर (4)वि.वि.शरण्या प्रधान(1)11-03,11-13,11-08,11-08;
स्पृहा गुजर(2) वि.वि.अहाना गोडबोले (3)12-10, 09-11, 11-08, 11-02;
अंतिम फेरी: स्पृहा बोरगांवकर वि.वि.स्पृहा गुजर(2)11-09, 07-11, 11-08, 08-11, 11-08;
19 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी
प्रणव घोळकर(1)वि.वि.प्रणव खेडकर(8)11-09, 11-09, 11-09;
नील मुळ्ये(5)वि.वि.आदित्य जोरी(4)11-05, 03-11, 11-07, 11-07;
इशान खांडेकर वि.वि.कौस्तुभ गिरगावकर(3)10-12,12-10,11-8,12-10
वेदांग जोशी(7)वि.वि.रामानुज जाधव 09-11,08-11,11-09,11-07,11-06 ;
19 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
राधिका सकपाळ वि.वि.धनश्री पवार (1)03-11,11-09,11-06,12-10;
सई कुलकर्णी(4) वि.वि.तितिक्षा पवार 11-08,11-06,11-01;
नभा किरकोळे (3) वि.वि.सुश्मिता जाधव 11-5,11-9,11-1
आनंदिता लुनावत (2) वि.वि.तनया अभ्यंकर 11-4,11-9,11-6
महत्वाच्या बातम्या –
‘नवीन चेंडूने हेच करायचे होते’, रोहित-विराटची विकेट घेतल्यानंतर काय म्हणाला शाहीन आफ्रिदी
ईशानने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीत पहिल्याच वनडेत ठोकल्या 82 धावा, नावावर खास विक्रमाची नोंद