भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषक खेळत नाहीये. अशात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात स्थान दिले गेले आहे. शमी मागच्या मोठ्या काळापासून टी20 प्रकारामध्ये भारतासाठी खेळला नाहीये. मात्र, भारतीय संघात सामील होण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर त्याने लगेच सरावाला सुरुवात केली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया चषक 2022 मध्ये दुखापतीच्या कारणास्तव खेळू शकला नव्हता. त्यांतर भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला पुन्हा दुखापत झाल्याचे समोर आले. याच कारणास्तव बुमराह आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून आणि नंतर टी20 विश्वचषकातून बाहेर झाला. त्यामुळे राखीव खेळाडूतील शमीची संघात वर्णी लागली.
Raring To Go! 💪 💪@MdShami11 hits the ground running. 👌 👌#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/97Yu9484hC
— BCCI (@BCCI) October 16, 2022
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 6 ऑक्टोबर रोजी पोहोचला होता. शमी मात्र आपल्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने ब्रिस्बेन येथे संघाच्या पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शमी शानदार लयीत दिसतोय. तो चांगल्या रन अपसह वेगात चेंडू टाकताना दिसला. तसेच तो यादरम्यान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याशी देखील चर्चा करताना दिसतोय.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू- मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, श्रेयस अय्यर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: धवनला न विचारताच वडिलांनी ठरवलं लग्न! वरून लेकालाच मारला जबरदस्त डायलॉग
धवनने ज्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली नाही जागा, त्यानेच ठोकल्या 11 चेंडूत 62 धावा