जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा रविवारी (२५ ऑक्टोबर) हंगामातील १२वा सामना झाला. दुबईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या या सामन्यात एका नव्या खेळाडूने आयपीएलमध्ये पाऊल ठेवले. हा खेळाडू म्हणजे, चेन्नईचा वेगवान गोलंदाज ‘मोनू कुमार’ होय. त्याला शार्दुल ठाकूरच्या ठिकाणी संघात स्थान देण्यात आले होते.
मात्र हा २५ वर्षीय गोलंदाज त्याच्या पदार्पणापेक्षा जास्त एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला. एकेकाळी मोनू कुमारला एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीचा सहाय्यक (असिस्टंट) म्हटले जात असायचे. अशात त्याच मोनू कुमारने धोनीच्या चेन्नई संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केल्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
कुमार हा मुळचा झारखंडची राजधानी रांची म्हणजे धोनीच्या शहरातील रहिवासी आहे. त्यामुळे तो धोनीचा जवळचा मित्र असल्याप्रमाणे आहे. म्हणून त्याची आणि साक्षीचीही चांगली ओळख आहे. काही वर्षांपुर्वी साक्षी मोनू कुमारच्या डोक्यावर किस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तेव्हापासून चाहत्यांनी त्याला साक्षीचा सहाय्यक म्हणायला सुरुवात केली.
https://twitter.com/bohutaalsi/status/1320304315454504961?s=20
कोण आहे मोनू कुमार?
मोनू कुमार हा वेगवान गोलंदाज अचूक लेंथच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. २०१७ साली धोनी झारखंड संघाकडून विजय हजारे ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये खेळला होता. त्यावेळी कुमारदेखील झारखंड संघाचा भाग होता. त्यामुळे कुमार आणि धोनीने एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. दरम्यान धोनीने त्याच्यातील प्रतिभेला हेरले.
कुमारने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका षटकात जवळपास ५ धावा दिल्या आहेत. तर, देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये प्रति षटक जवळपास ६.९० धावा खर्च केल्या आहेत. तो २०१४ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत १० अ दर्जाचे सामने खेळत ११ विकेट्स चटकावल्या आहेत. तर, २२ देशांतर्गत टी२० सामने खेळत २५ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त तो गरजेनुसार फलंदाजीदेखील करु शकतो.
महत्त्वाचे म्हणजे, २०१८ सालीच त्याची चेन्नई संघात निवड झाली होती. मात्र त्याला आतापर्यंत एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण बेंगलोरविरुद्धच्या हंगामातील ४४व्या सामन्यात त्याला अंतिम ११मध्ये संधी मिळाल्यामुळे त्याचे आयपीएल पदार्पणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण
धोनीच्या ‘त्या’ एका सल्लाने बेंगलोरच्या गोलंदाजाचे बदलले आयुष्य
चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ