भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आगामी कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला (Morne Morkel) भारतीय संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मॉर्केल, हा त्याच्या उंचीमुळे आणि उच्च हातानं गोलंदाजी करण्याच्या विविध शैलींमुळे अवघड खेळपट्ट्यांवरही चमकदार कमगिरी करु शकला, तो फलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक होता. क्रिकेटर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर मॉर्केलनं प्रशिक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी केली.
मॉर्केल हा पाकिस्तानचा देखील गोलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे. ज्याच्या मार्गदर्शनाचा फायदा पाकिस्तानचा वेगवान सनसनाटी गोलंदाज नसीम शाह याच्यावर झाला. प्रशिक्षक म्हणून अतिशय सक्रिय असलेला मोर्ने मॉर्केल हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) पहिली पसंती होती. मॉर्केलचा गोलंदाज म्हणून सामना करणं त्याच्यासाठी कधीच सोपं नव्हतं, असं गंभीरनं स्वतः मान्य केलं आहे.
माॅर्ने माॅर्केलनं (Morne Morkel) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत, लाईन-लेन्थवर आणि त्याच्या धावण्यावर जबरदस्त नियंत्रण शिकले होते. त्याच्या गोलंदाजीच्या अनुभवाचा भारतीय गोलंदाजांना देखील बराच फायदा होऊ शकतो.
मॉर्केलनं त्याच्या कारकिर्दीत दुखापतींपासून चांगले शिकले आणि चढ-उतारांवर देखील मात केली. ही देखील चांगली गोष्ट आहे. गोलंदाजाला त्याच्या शरीराला सावरण्यासाठी किती वेग द्यावा लागतो हे त्याला चांगलच माहीत आहे. गोलंदाजाचे शरीर कसे कार्य करते. भारताचा प्रसिद्ध कृष्णा हा असाच एक गोलंदाज आहे जो दुखापतींशी झुंज देत आहे. मयंक यादव हा युवा गोलंदाज आहे ज्याचा वेग खूप उत्सुकता निर्माण करतो. मॉर्केलला या युवा खेळाडूंसोबत सर्वाधिक काम करावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात…”, मोहम्मद शमीच्या एक्स पत्नीची कोलकाता प्रकरणावरील पोस्ट व्हायरल
आश्चर्यकारक…! वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप-5 गोलंदाजांमध्ये एकही नाही भारतीय
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video