fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सगळा नशीबाचा खेळ! दोन वर्ष प्रयत्न करुनही कोहलीच्या पदरी निराशाच

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात ८२ तर दुसऱ्या डावात ० धावेवर बाद झाला.

विराट कोहलीला यावर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती.

विराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ शतके केली आहेत. तर सचिनने १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ शतके केली होती.

विशेष म्हणजे विराटला हा पराक्रम करण्याची २०१७मध्येही संधी मिळाली होती. परंतु तेव्हा विराटला अपयश आले होते.

सचिनने १९९८मध्ये ३९ सामन्यात हा पराक्रम केला होता. यातील ८ शतके सचिनने परदेशात तर ४ भारतात केली होती.

विराटने यावर्षी ११ पैकी ४ शतके भारतात तर ७ शतके परदेशात केली आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटला ही संधी होती. परंतु आता विराटला २०१९मध्ये पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू

१२- सचिन तेंडूलकर- १९९८

११- विराट कोहली- २०१७

११- विराट कोहली- २०१८

११- रिकी पाॅटिंग- २००३

महत्त्वाच्या बातम्या:

तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की

१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत

जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज

 

 

You might also like