भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम, मुंबई येथे पार पडला. हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर खेळली गेली. यामध्ये भारतीय महिला संघाने शानदार विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे, सलामी फलंदाज स्म्रीती मंधाना हिला तिच्या शानदार खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. तिने सामन्यात अर्धशतक ठोकत शानदार विक्रमही आपल्या नावावर केला. चला तर जाणून घेऊया काय आहे तो विक्रम…
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 1 विकेट गमावत 187 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानेही 5 विकेट्स गमावत 187 धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामन्याचा निकाल लागण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 1 विकेट गमावत 20 धावा केल्या. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलिया संघाला 1 विकेट गमावत 16 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना सुपर ओव्हरमध्ये 4 धावांनी जिंकला.
Australia lose their first T20I of 2022 as India level the series 1-1 with a Super Over win 🎉#INDvAUS | https://t.co/eX1HPRfID6 pic.twitter.com/16683tGGNJ
— ICC (@ICC) December 11, 2022
सामन्या भारतीय संघाकडून स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 49 चेंडूत 79 धावा केल्या. या धावा करताना तिने 4 षटकार आणि 9 चौकार मारले. या अर्धशतकासह स्म्रीतीच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. स्म्रीती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारी फलंदाज बनली. तिने अशी कामगिरी आतापर्यंत 12 वेळा केली आहे.
For her incredible batting performance, Smriti Mandhana bags the Player of the Match award as #TeamIndia beat Australia in the Super Over 👌👌#INDvAUS pic.twitter.com/VeKi3PdCuz
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2022
भारतीय पुरुष खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा नंबर
याव्यतिरिक्त भारतीय पुरुष खेळाडूंमध्ये अशी कामगिरी सर्वाधिकवेळा विराट कोहली (Virat Kohli) याने केली आहे. विराटने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 20 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. (Most 50+ Scores in Chases smriti mandhana in the list)
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
पुरुष टी20 क्रिकेट- विराट कोहली (20 वेळा)
महिला टी20 क्रिकेट- स्म्रीती मंधाना (12 वेळा)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने वाढल्या टीम इंडियाच्या अडचणी; WTC अंतिम फेरीसाठी करावा लागणार संघर्ष
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट, ‘या’ धुरंधराची संघात एन्ट्री