हैद्राबाद। काल(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
विराटने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही 112 वी वेळ होती.
त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी(Most 75-plus knocks in international cricket) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
तसेच त्याने या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची(Ricky Ponting) बरोबरी केली आहे. पॉटिंगनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 112 वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर(Sachin Tendulkar) आहे. सचिनने 168 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 धावांचा आकडा पार केला आहे. तसेच या यादीत विराट आणि पॉटिंग पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस(Jacques Kallis) आहे. कॅलिसने 111 वेळा हा कारनामा केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 75+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
168 वेळा – सचिन तेंडूलकर
112 वेळा – विराट कोहली
112 वेळा – रिकी पॉटिंग
111 वेळा – जॅक कॅलिस
108 वेळा – कुमार संगकारा
अखेर 'त्या' यादीत रनमशिन विराट कोहली ठरला रोहित शर्माला सरस!
वाचा????https://t.co/rRSu1ajwGd????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019
जडेजासाठी वाढदिवस ठरला खास; या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
वाचा????https://t.co/0G08zmQCqF????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #RavindraJadeja— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019