हॅमिल्टन। भारताला आज न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. याबरोबरच रोहित शर्माला कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वा सलग विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी त्याने फक्त 3 सामन्यात पराभव स्विकारला होता. तसेच त्याने नेतृत्व केलेल्या मागील 12 सामन्यात भारतीय संघाने सलग विजय मिळवला आहे.
त्यामुळे तो भारतीय कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याच्या यादीत भारताचा नियमित विराट कोहलीसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकला असता तर त्याला विराटचा कर्णधार म्हणून सलग 12 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच विक्रम मागे टाकता आला असता.
विराटने 2017 मध्ये सलग 12 सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवले होते.
रोहितने आत्तापर्यंत भारताचे 9 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 2 सामन्यात पराभव तर 7 सामन्यात विजय मिळवले आहेत. तसेच 12 टी20 सामन्यात रोहितने भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील 11 सामन्यात विजय आणि 1 सामन्यात पराभव भारताला स्विकारावा लागला आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली मागीलवर्षी भारताने एशिया कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–१६ वर्षांनंतर टीम इंडियाने मोडला स्वत:चाच नकोसा असा विक्रम
–२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की
–धावा केल्या सातच तरी रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान