लंडन। आज, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलस्टर कूकने सलग १५३ कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसराच खेळाडू आहे. यापुर्वी अॅलन बाॅर्डर यांनी सलग १५३ कसोटी सामने खेळले होते.जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सलग सामने खेळण्याचा विक्रम हा अॅलन बॉर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून जे १५६ कसोट सामने खेळले त्यातील तब्बल सलग १५३ सामने ते संघाचे नियमित सदस्य होते.
जागतिक क्रिकेटमध्ये केवळ ५ खेळाडूंनी १०० पेक्षा अधिक सामने देशासाठी सलग खेळले आहेत.
अॅलस्टर कूकने नागपुरला १ मार्च २००६ भारताविरुद्ध पदार्पण केले होते. त्या सामन्यात ६० आणि नाबाद १०४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत इंग्लड संघ १५६ सामने खेळला आहे. त्या १५५ सामन्यात कुक संघाकडून खेळला आहे. केवळ सुरुवातीच्या एका लढतीमध्ये तो संघाचा भाग नव्हता. परंतु त्यानंतर त्याने सलग १५३ कसोटी खेळत नव्या विक्रमला गवसणी घातली.
तो खेळलेल्या १५३ सामन्यात इंग्लडला ६८ विजय आणि ४१ पराभव पहावे लागले तर २१ सामने ड्राॅ राहिले आहेत. या १५३ सामन्यात त्याने ४५.७५ च्या सरासरीने ११८९५ धावा केल्या आहेत. त्याच्या पदार्पणापासुन कोणत्याही खेळाडूने ९ हजार पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.
न्युझीलॅंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम हा सलग १०१ सामने खेळला असुन तो संपुर्ण कारकिर्दीत तेवढेच सामने खेळला आहे.
भारताकडून सुनिल गावसकर (१०६), राहुल द्रविड (९३), गुंडप्पा विश्वनाथ (८७), सचिन तेंडूलकर (८७) आणि मोहम्मद अझरुद्दीन (६९) सलग कसोटी सामने खेळले आहेत.
देशाकडून सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू
१५३- अॅलन बाॅर्डर
१५३- अॅलस्टर कूक
१०७- मार्क वाॅ
१०६- सुनिल गावसकर
१०१- ब्रेंडन मॅक्क्युलम pic.twitter.com/3NOYkf4vtP— Sharad Bodage (@SharadBodage) May 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!
–विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!