सध्या नॉटिंघममध्ये भारत आणि इंग्लंड संघामध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून खेळण्यास सुरुवात झाली. याच पहिल्या सामन्याचा शनिवारी (७ ऑगस्ट) चौथा दिवस होता. या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपला. पण पहिल्या डावात ९५ धावांची पिछाडी स्विकारल्याने इंग्लंडने भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रुटने शतकी खेळी केली, याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
रुटने या डावात १७२ चेंडूच १४ चौकारांसह १०९ धावांची खेळी केली. यासह त्याने कारकिर्दीतील २१ वे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच भारताविरुद्धचे त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९ वे शतक ठरले. त्यामुळे त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने ऍलिस्टर कूकला मागे टाकले आहे. कूकने भारताविरुद्ध ८ शतकं केली आहे. तसेच कूक पाठोपाठ या यादीत ७ शतकांसह केविन पीटरसन आहे.
रुटने भारताविरुद्ध आत्तापर्यंत ४६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.७९ च्या सरासरीने २८५१ धावा केल्या असून यात ९ शतकांचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज –
९ – जो रुट (४६ सामने)
८ – ऍलिस्टर कूक (५७ सामने)
७ – केविन पीटरसन (४८ सामने)
६ – इयान बेल (५१ सामने)
६ – ग्रॅहम गुच (३६ सामने)
अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी
या सामन्यात चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १४ षटकात १ बाद ५२ धावा केल्या आहेत. अजून भारताला १५७ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयासाठी भारताच्या ९ विकेट्स घेण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहचा बूमरँग! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा भारतीय गोलंदाज
सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट
भारताविरुद्ध खणखणीत वाजणारे नाणं म्हणजे जो रूट, एकदा हे आकडे पाहा सर्व समजून जाल