ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, 2004नंतर ऑस्ट्रेलियाला भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आली नाहीये. अशात या मालिकेत कोण कशी कामगिरी करतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी आपण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…
सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार कुणाच्या नावावर?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) कसोटी मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक ‘मालिकावीर’ पुरस्कार (Man of The Series) पटकावण्याचा मान भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत सचिनने आतापर्यंत एकूण 3 मालिकावीर पुरस्कार पटकावेल आहेत. फक्त एकट्या सचिननेच या मालिकेत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये भारताचा दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नावाचा समावेश नाहीये.
सचिनव्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या नावावर प्रत्येकी 1 पुरस्कार
सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त आर अश्विन, मायकल क्लार्क, पॅट कमिन्स, राहुल द्रविड, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत प्रत्येकी एक वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे. तसेच, ब्रेट ली, डेमियन मार्टिन, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नावावरही प्रत्येकी 1 मालिकावीर पुरस्काराची नोंद आहे. अशाप्रकारे एकूण 12 खेळाडूंमध्ये 7 भारतीय खेळाडूंनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे. (Most M.O.S Awards in Border Gavaskar Trophy Series sachin tendulkar on top)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू
3 वेळा- सचिन तेंडुलकर
1 वेळा- आर अश्विन
1 वेळा- मायकल क्लार्क
1 वेळा- पॅट कमिन्स
1 वेळा- राहुल द्रविड
1 वेळा- हरभजन सिंग
1 वेळा- रवींद्र जडेजा
1 वेळा- ब्रेट ली
1 वेळा- डेमियन मार्टिन
1 वेळा- चेतेश्वर पुजारा
1 वेळा- ईशांत शर्मा
1 वेळा- स्टीव्ह स्मिथ
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती
Video: एकेकाळी गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या मलिंगाने वाजवला पियानो; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’