मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताच्या या विजयात एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
त्याचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक होते. त्याने या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला असून हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
त्याचबरोबर त्याने वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली, युवराज सिंग, सौरव गांगुली यांच्या 7 मालिकावीर पुरस्कारांची बरोबरी केली आहे. त्यामुळे तो आता या क्रिकेटपटूंसह या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
याबरोबरच धोनी या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने या मालिकेत 193 च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात भारताकडून धोनी आणि केदार जाधवने अर्धशतके केली आहे. या सामन्यात धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावा आणि केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहलीनेही 46 धावा करत चांगली खेळी केली होती.
तत्पूर्वी भारताकडून युजवेंद्र चहलने 42 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले
–ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास
–चार वर्षांनंतर धोनीने केली त्या पराक्रमाची पुनरावृत्ती