टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

सामन्यात चांगली कामगिरी केली तर सामनावीर तसेच मालिकेत चांगली कामगिरी केली तर मालिकावीर पुरस्कार दिले जातात. कोणत्याही मालिकेत सामने तर जिंकावे लागतातच परंतु जो संघ जास्त सामने जिंकेल तोच मालिकेत विजयी होतो. अशाच मालिकांत विजयी होण्यासाठी गरज असते ती मालिकेतील सर्व सामन्यांत सातत्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची.

मालिकेत जर सातत्यपुर्ण कामगिरी केली तर त्याचे फळही तसेच असते. त्यातही ही सातत्यपुर्ण कामगिरी जर कसोटी मालिकेत असेल तर सोने पे सुहागा. लोक त्या खेळाडूच्या कामगिरीला नक्कीच लवकर विसरत नाही.

कधीकधी काही खेळाडू असेही असतात ज्यांना मालिकेत एकही सामनावीर पुरस्कार मिळालेला नसतो परंतु ते मालिकावीर ठरतात. याला कारण म्हणजे त्यांनी त्या मालिकेतील सामन्यांमध्ये सतत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची अव्वल कामगिरी केलेली असते.

मालिकावीर पुरस्कार म्हटलं की, चटकन क्लॉईड लॉईड सचिनला विश्वचषकात सामनावीर पुरस्कार देतानाचा फोटो येतो ना मनात. हेच मालिकावीराचे महत्त्व अधोरेखीत करते.

कसोटी क्रिकेटमध्ये १ सामन्यापासून ६ सामन्यांपर्यंत कसोटी मालिका खेळविण्यात आल्या आहेत. आज या लेखात आपण कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळालेले खेळाडू पहाणार आहोत.

६. आर. अश्विन- 

भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा गेली ९ वर्ष समर्थपणे सांभाळणाऱ्या अश्विनने जेमतेम २८ कसोटी मालिकांत ७ वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवले आहेत. जर थोडं आठवलं तर लक्षात येतं की वेळ संध्याकाळची आहे आणि विरोधी संघाच्या अगदी कमी अंतराने सतत विकेट्स पडताय. तेव्हा अर्थातच भारताचा हा क्रिकेटर विकेट घेत असतो. भारतीय उपखंडात सामने असतील तर अश्विनच्या गोलंदाजीला जी धार येते ती पहाण्यासारखी असते.

अश्विनने भारताकडून २८ मालिकांत ७१ कसोटी सामन्यांत ४२ सामने जिंकून देताना चांगली कामगिरी बजावली आहे.

५. शेन वाॅर्न-

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वाॅर्नने कसोटी मालिकेत १७वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे, हे आपणास माहितंच आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी येथे क्लिक करा.  परंतु या शेन वाॅर्नने किती मालिकावीर पुरस्कार मिळवले हे माहित असलेले क्रिकेटप्रेमी थोडे कमीच. शेन वाॅर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामने खेळताना ४६ पैकी तब्बल ८  मालिकांत मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे. त्यातही तो ९२ कसोटी सामन्यांत संघाचा विजय होताना सदस्य राहिला आहे.

४. सर रिचर्ड हॅडली- 

अष्टपैलू क्रिकेटर रिचर्ड हॅडली यांनी न्यूझीलंडकडून खेळताना ८६ कसोटी व ११५ वनडे सामन्यांत भाग घेतला. त्यात त्यांनी गोलंदाजी व फलंदाजी अशा दोनही विभागात चांगली कामगिरी केली. कसोटीत फलंदाजी करताना २७.१६ची सरासरी तर गोलंदाजी करताना २२.२९ची सरसरी. अशा या महान खेळाडूने कसोटीत ३३ मालिकांत ८ वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवला आहे.

३. इम्रान खान-

या यादीतील सर्वात अनपेक्षित नाव अर्थातच पाकिस्तानचे माजी कर्णधार व सध्याचे पंतप्रधान इम्रान खान. इम्रान खान यांनी पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देण्यातही मोठं योगदान दिलं आहे. याच इम्रान खान यांनी पाकिस्तानकडून ८८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी एकूण २८ मालिकांत भाग घेताना ८ मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. जवळपास दर  तिसऱ्या कसोटी मालिकेत ते मालिकावीर ठरले आहेत.

२. जॅक कॅलिस-

जगातील सर्वोत्तम क्रिकेटर असलेला कॅलिस त्याच्या अष्टपैलू खेळीमुळे क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. कसोटी वनडे व टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याने गोलंदाजी व फलंदाजी अशा दोनही प्रकारात जवळपास ६ विभाग सांभाळले आहेत. शिवाय यालाच जोड देत अफलातून क्षेत्ररक्षणही केले आहे.

कॅलिस आफ्रिकेकडून एकूण १६६ कसोटी सामने खेळला. यात त्याने ६१ कसोटीत त्याने ९वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवला आहे. हे करताना कसोटीत ४५.९७ची फलंदाजी करताना तर ३२.६५ची गोलंदाजी करताना त्याची सरासरी राहिली आहे. त्यामुळे त्याचं नाव या यादीत असणारंच याच कोणतीही शंका नाही.

१. मुथय्या मुरलीधरन-

८०० विकेट्स, १३३ कसोटी सामने, ६१ कसोटी मालिका, ५४ कसोटी विजय, १९ वेळा कसोटीत सामनावीर व तब्बल ११वेळा मालिकावीर. जगातील कोणत्याही क्रिकेटरची अशी कसोटी कारकिर्द नक्कीच राहिली नसणार.

प्रत्येक ६व्या कसोटी मालिकेत मुरलीधरनने मालिकावीर पुरस्कार मिळवला आहे. कसोटी विजयात गोलंदाजांवरच संघाची सर्वाधिक भिस्त का असते हे मुरलीधरनने दाखवुन दिले आहे. भारतीय उपखंडातील या महान गोलंदाजाने जगातील अनेक कसोटी मैदानावर अक्षरश: राज्य केले आहे.

सचिन-विराट या यादीत कुठे??? 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २०० कसोटी सामन्यांत मिळून ७४ कसोटी मालिका खेळल्या. यामुळे कसोटी सामन्यांप्रमाणेच सर्वाधिक कसोटी मालिका खेळण्याचा विक्रमही याच दिग्गजाच्या नावावर आहे. परंतु त्याचप्रमाणे कसोटीत मालिकावीर पुरस्कार मिळविण्यात सचिनला यथ मात्र मिळाले नाही. सचिनला ७४ कसोटी मालिकांत केवळ ५ वेळा मालिकावीर पुरस्कार मिळाला.

विराट कोहलीने ३० कसोटी मालिकांत ८६ सामने खेळले आहेत. या ३० मालिकांत ३वेळा तो मालिकावीर ठरला आहे. विराटकडे सचिन-आश्विनचे हे विक्रम मोडण्याची नक्कीच संधी आहे. परंतु सध्या कसोटी क्रिकेटचे प्रमाण पाहिले तर हे दुसऱ्या बाजूला अवघडही वाटत आहे.

असेच काही मनोरंजक लेख-

टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा

You might also like