आयपीएल २०२० चा दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा मुंबई आणि बेंगलोरचा प्रत्येकी तिसरा सामना होता. हा सामना बेंगलोरने सुपर ओव्हरमध्ये काबीज केला. आणि हंगामातील दुसरा विजय मिळवला.
बेंगलोरकडून प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २४ चेंडूत ५५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली. त्याने केलेल्या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवत त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक २१ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केला आहे. याबाबतीत त्याने रोहित शर्मा, एमएस धोनी, डेव्हिड वॉर्नर आणि यूसुफ पठाण या खेळाडूंना मागे टाकले आहे.
या विक्रमात त्याने युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. ख्रिस गेलनेही आतापर्यंत आयपीएल इतिहासात सर्वाधिक २१ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवण्याचा कारनामा केला आहे. याबाबतीत तो गेलसोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
यापूर्वी रोहितने १८, धोनी आणि वॉर्नरने १७, तर यूसुफने १६ वेळा हा पुरस्कार मिळवण्याचा कारनामा केला आहे.
डिविलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४४ च्या सरासरीने ४५२९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणारे खेळाडू
२१- एबी डिविलियर्स*
२१- ख्रिस गेल
१८- रोहित शर्मा
१७- एमएस धोनी
१७- डेविड वॉर्नर
१६- यूसुफ पठाण