क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा एक अवघड प्रकार समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन फलंदाजी करण तर त्याहुन कठीण. ती कसोटी जर परदेशात असेेल तर भल्या भल्या खेळाडूंना टेन्शन येतं.
परंतु जगात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी सलामीला फलंदाजीला येत क्रिकेट गाजवलं आहे. सर्व देशांच्या मिळून ९६५ खेळाडूंनी कसोटीत सलामीला आपलं नशीब आजमावलं आहेत परंतु यातील केवळ १० खेळाडूंना १०० किंवा अधिक कसोटी सामने सलामीला खेळता आले आहेत.
भारतीयांमध्ये केवळ सुनिल गावसकर यांनी १००पेक्षा अधिक कसोटी सामने सलामीला खेळले आहेत. तर सेहवागने ९९ कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे.
२००६ ते २०१८ या काळात इंग्लंडचा महान फलंदाज सर एलिस्टर कूकने सर्वाधिक अर्थात १५४ कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे.
सलामीला फलंदाजी करताना १०० किंवा अधिक सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सरासरी मेथ्थु हेडन (५०.७३) व सुनिल गावसकर (५०.२९) यांची राहिली आहे.
तर सलामीला फलंदाजी करताना केवळ एलिस्टर कूकलाच (११८४५) १० हजार धावांचा टप्पा पार करता आला आहे.
११० कसोटी सामन्यातील १८६ डावात सुनिल गावसकर यांनी सामन्यातील पहिला चेंडू खेळण्याचा विक्रम केला आहे तर ग्रॅमी स्मिथने १०३ सामन्यात १३५ वेळा सामन्यातील पहिला चेंडू खेळला आहे.
सर्वाधिक कसोटी सामने सलामीवीर म्हणून खेळणारे खेळाडू-
१५४- सर एलिस्टर कूक, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १६१
११९- सुनिल गावसकर, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १२५
११६- डेसमंड हेन्स, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- ११६
११४- ग्रॅमी स्मिथ, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- ११७
१०८- माईक अथर्टन, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-११५
१०७- जेफ बाॅयकाॅट, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०८
१०७- सर गाॅर्डन ग्रिनीच, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०८
१०४- मार्क टेलर, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने- १०४
१०३- मेथ्थ्यु हेडन, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-१०३
१००- ग्रॅहम गूच, एकूण कारकिर्दीतील कसोटी सामने-११८
ट्रेंडिंग घडामोडी-
–व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक
-क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
-रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर