ऍडलेड। भारताचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक केले आहे.
हे शतक त्याने 108 चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 39 वे तर एकूण 64 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. याबरोबरच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत कुमार संगकाराच्या 63 शतकांना मागे टाकले आहे.
विराट सचिनला सरस-
वनडेत विराटने आजपर्यंत ३९ शतके केली आहेत. त्यातील ३२ शतके विराटने केल्यावर टीम इंडियाला विजय मिळाला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वनडे ४९ शतके केली असून त्यात संघाला ३३वेळा विजय मिळाला आहे.
सचिनने टीम इंडिया पराभूत झालेल्या वनडे सामन्यात १४ शतके केली आहेत तर विराटने ६वेळा अशी शतके केली आहेत. सचिन- विराटने प्रत्येकी एक शतक टाय सामन्यात केले आहे. तर कोणताही निकाल न लागलेल्या सामन्यातही सचिनने एक शतक केले आहे.
वनडेत विजय मिळवलेल्या सामन्यात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-
३३- सचिन तेंडूलकर
३२- विराट कोहली
२५- रिकी पाॅंटींग
२४- हशीम आमला
२४- सनथ जयसुर्या
महत्त्वाच्या बातम्या –
–आता फक्त पाॅंटींगच मध्ये, सचिन विराटमधील शतकांची दरी झाली कमी
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास