बांगलादेश संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाची चांगलीच दाणादाण उडवली आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत बांगलादेशने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. असे असले, तरीही भारतीय संघाचे खेळाडू विक्रमांचा रतीब घातलाना दिसत आहेत. बुधवारी (दि. 07 डिसेंबर) दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा दुखापतग्रस्त होऊनही त्याने 5 षटकार मारले आणि त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 षटकारांचा टप्पा पार केला. याच वनडेत श्रेयस अय्यर यानेही कमी डावांमध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला.
दुसऱ्या वनडेत बांगलादेश (Bangladesh) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 271 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 102 चेंडूंचा सामना करताना 82 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 6 चौकारही मारले. या अर्धशतकी खेळीमुळे अय्यरच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
Shreyas Iyer keeping India in the hunt 💪#BANvIND | Scorecard 👉 https://t.co/A76VyZDXby pic.twitter.com/4ENo83RTcU
— ICC (@ICC) December 7, 2022
श्रेयस अय्यर भारतीय संघाकडून वनडेत 34 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला. अय्यरने 34 डावांनंतर सर्वाधिक 1534 धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 34 डावांनंतर 1414 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी नवज्योत सिंग सिद्धू हे असून त्यांनी 34 डावांनंतर 1321 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याचा या यादीत चौथा क्रमांक असून त्याने 1312 धावा केल्या आहेत. या यादीतील शेवटचा खेळाडू एमएस धोनी असून त्याने 34 डावांनंतर 1204 धावा केल्या होत्या.
वनडेत 34 डावांनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1534 धावा- श्रेयस अय्यर*
1414 धावा- विराट कोहली
1321 धावा- नवज्योत सिंग सिद्धू
1312 धावा- शिखर धवन
1204 धावा- एमएस धोनी
सामन्याचा आढावा
बांगलादेशच्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 266 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना बांगलादेशने 5 धावांनी खिशात घातला. (Most ODI runs for India after 34 inns shreyas iyer beat virat kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या जखमी वाघाने रचला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला जगातला दुसरा, तर टीम इंडियाचा पहिलाच फलंदाज
टीम इंडियाचं नशीबच खराब! मालिका तर गमावलीच, पण आता रोहितसह ‘हे’ तीन खेळाडूही होणार बाहेर