Loading...

बंगळुरु वनडेत ऑस्ट्रेलियाला नडलेल्या विराट, रोहितचा मोठा पराक्रम

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने मोठा पराक्रम केला आहे.

या सामन्यात रोहितने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 128 चेंडूत 119 धावांची खेळी केली. तर विराटने 91 चेंडूत 8 चौकारांसह 89 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर विराट ब्रायन लारा आणि ओएन मॉर्गन यांना मागे टाकत 5 व्या क्रमांकावर आला आहे.

विराटच्या आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 40 वनडे सामन्यात 54.57 च्या सरासरीने 1910  धावा झाल्या आहेत. तसेच रोहितच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध 40 वनडे सामन्यात 61.33 च्या सरासरीने 2208 धावा झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडूलकर असून त्याने 71 वनडे सामन्यात 3077 धावा केल्या आहेत.

तसेच या यादीत देसमंड हाइन्स (2262) दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या तर व्हिव रिचर्ड्स(2187) चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट पाचव्या, मॉर्गन(1864) सहाव्या आणि लारा(1858) सातव्या क्रमांकावर आहेत.

Loading...

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

3077 धावा – सचिन तेंडुलकर

2262 धावा – देसमंड हाईन्स

2208 धावा – रोहित शर्मा

2187 धावा – व्हिव रिचर्ड्स

1910 धावा – विराट कोहली

1864 धावा – ओयन मॉर्गन

1858 धावा – ब्रायन लारा

Loading...

You might also like
Loading...