प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात. असेच क्रिकेटपटूंच्या बाबतीतही असते. काही सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना जोरदार ट्रोल केले जाते, पण हेच खेळाडू पुढच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण चांगले प्रदर्शन करून दाखवतात. यावेळी फक्त चांगले प्रदर्शनच नाही, तर शानदार विक्रमही करतात. अशा खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर याच्या नावाचाही समावेश होतो. श्रेयसने विश्वचषक 2023 स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर खेळताना जबरदस्त फलंदाजी करत खास विक्रम आपल्या नावावर केला.
श्रेयसचा विक्रम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 37वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला. यावेळी भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर आला होता. यावेळी श्रेयसला त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी 23 धावा कमी पडल्या. या सामन्यात 87 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. अय्यरने पहिल्या 27 धावा या 50 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. मात्र, पुढील 50 धावांसाठी त्याने फक्त 37 चेंडू खेळले. अय्यरने या धावांसह स्पर्धेत 8 सामने खेळताना 48.83च्या सरासरीने आपल्या 293 धावा पूर्ण केल्या.
या धावा करताच तो कोणत्याही विश्वचषकाच्या एका हंगामात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही याबाबतीत मागे टाकले. विश्वचषकाच्या एका हंगामात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. त्याने 1992च्या विश्वचषकात 229 धावा केल्या होत्या.
सचिनपाठोपाठ या यादीत तिसऱ्या स्थानी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आहे. रहाणेने 2015च्या विश्वचषकात 208 धावा केल्या होत्या. तसेच, चौथ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने 2011च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. (Most Runs in a World Cup Edition by India’s No 4 batters see list)
विश्वचषकाच्या एका हंगामात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे भारतीय
293 – श्रेयस अय्यर (2023)*
229 – सचिन तेंडुलकर (1992)
208 – अजिंक्य रहाणे (2015)
202 – विराट कोहली (2011)
हेही वाचा-
फखर जमानच्या झंझावाती शतकाने पीसीबी अध्यक्ष खूश, केलं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस जाहीर
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट