---Advertisement---

रोहित शर्माला मागे टाकत किंग कोहली त्या खास यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान!

On: सोमवार, डिसेंबर 9, 2019 8:00 AM
---Advertisement---

तिरुअनंतरपुरम। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(8 डिसेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विश्वविक्रम केला आहे. विराटला या सामन्यात केवळ 19 धावा करता आल्या. परंतू तरीही तो आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मागे टाकले आहे. विराटचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 74 सामन्यात 51.26च्या सरासरीने 2563 धावा झाल्या आहेत. तर रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 103 टी20 सामन्यात 2562 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे रविवारच्या सामन्याआधी या यादीत रोहित अव्वल क्रमांकावर होता. तर विराट दुसऱ्या क्रमांकावर होता. या दोघांमध्ये केवळ 3 धावांचे अंतर होते.

मात्र रोहित रविवारी 15 धावांवर बाद झाला. तर विराट त्याच्यापेक्षा चार धावा जास्त करत 19 धावांवर बाद झाला. त्यामुळे केवळ 1 धावेने विराटने रोहितला मागे टाकत या यादीत अव्वल क्रमांक मिळवला.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

2563 धावा – विराट कोहली (74 सामने)

2562 धावा – रोहित शर्मा (103 सामने)

2436 धावा – मार्टिन गप्टिल (83 सामने)

2263 धावा – शोएब मलिक (111 सामने)

2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---