चेन्नई सुपर किंग्स संघासाठी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत खोऱ्याने धावा काढण्याचं काम सलामी जोडीने केलं आहे. ही जोडी म्हणजेच ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांची होय. या जोडीने धावांचा पाऊस पाडत खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तसेच, ही जोडी चेन्नईसाठी सर्वोत्तम जोडीही ठरली आहे. चला तर ऋतुराज आणि डेवॉनने काय विक्रम केलाय, जाणून घेऊयात…
मंगळवारी (दि. 23 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघात पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी चेन्नईने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 172 धावा केल्या. यावेळी चेन्नईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे (Ruturaj Gaikwad And Devon Conway) आले होते. त्यांच्यात पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी झाली. यामध्ये कॉनवेच्या 25 आणि ऋतुराजच्या 44 चेंडूत 60 धावांचे योगदान होते. कॉनवेही सामन्यात 34 चेंडूत 40 धावा करू बाद झाला. मात्र, त्यांच्या भागीदारीमुळे खास विक्रम नोंदवला गेला.
ऋतुराज-कॉनवेचा विक्रम
झाले असे की, 87 धावांच्या भागीदारीमुळे ऋतुराज आणि कॉनवे यांनी सीएसकेसाठी भागीदारी करताना आतापर्यंत एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यांच्यात 757पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. त्यांच्यापूर्वी आयपीएल 2021मध्ये फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी 756 धावांची भागीदारी केली होती. तसेच, आयपीएल 2013मध्ये मायकल हसी आणि सुरेश रैना यांच्यात 587 धावांची भागीदारी झाली होती. त्याच वर्षी मायकल हसी आणि मुरली विजय यांनी सीएसकेसाठी 540 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर 2014मध्ये ब्रेंडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांनी सीएसकेसाठी 513 धावांची भागीदारी केली होती. (Most runs scored by a CSK pair in a season of IPL know the list)
एका आयपीएल हंगामात सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या
757* – ऋतुराज गायकवाड-डेवॉन कॉनवे, (आयपीएल 2023)*
756 – फाफ डू प्लेसिस- ऋतुराज गायकवाड (आयपीएल 2021)
587 – मायकल हसी- सुरेश रैना (आयपीएल 2013)
540 – मायकल हसी- मुरली विजय (आयपीएल 2013)
513 – ब्रेंडन मॅक्युलम- ड्वेन स्मिथ (आयपीएल 2014)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: वेस्ट इंडिजचा बडा क्रिकेटपटू फिक्सिंग प्रकरणात निलंबित, क्रिकेटविश्वात खळबळ
एक-दोन नाही हंगामातील 10 सामन्यात धोनीने दाखवलं धाडस, गुजरातविरुद्ध उतरवली आपली खास प्लेइंग इलेव्हन