भारताला १० जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी भारताने या मालिकेत २-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या या मालिका विजयात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २ सामन्यांतील ६ षटकांत ४ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
भुवनेश्वर हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत ७ मालिकावीर पुरस्कारांसह विराट अव्वल क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर २ मालिकावीर पुरस्कारांसह रोहित शर्मा आणि युझवेंद्र चहल आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)