Loading...

कर्णधार कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी

अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात 100 धावांवर सर्वबाद करत 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटचा हा कसोटी कर्णधार म्हणून एकून 27 वा विजय होता. त्यामुळे भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत विराटने धोनीची बरोबरी केली आहे. आता विराट आणि धोनी या यादीत विभागून अव्वल क्रमांकावर आहेत.

धोनीनेही कसोटीमध्ये भारताचे 60 सामन्यात नेतृत्व करताना 27 विजय मिळवले आहेत.

कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना विराटचे आता 47 सामन्यात 27 विजय झाले आहेत. त्याचबरोबर त्याला 10 सामन्यात पराभव स्विकारावा लागलेला आहे, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

अँटिग्वा येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित करत पहिल्या डावात मिळवलेल्या 75 धावांच्या आघाडीसह वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 419 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात सर्वबाद 100 धावाच करता आल्या.

Loading...

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या.

#कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार-

27 – एमएस धोनी (60 सामने)

27 – विराट कोहली (47 सामने)

Loading...

21 – सौरव गांगुली (49 सामने)

14 – मोहम्मद अझरुद्दीन (47 सामने)

9 – सुनील गावस्कर (47 सामने)

9 – मन्सूर अली पतौडी (40 सामने)

Loading...

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

तब्बल ९६ वर्षांनंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये केला असा पराक्रम

रोमांचकारी झालेल्या तिसऱ्या ऍशेस सामन्यात इंग्लंडचा १ विकेटने विजय

…म्हणून पीव्ही सिंधूने ऐतिहासिक सुवर्णपदक केले आईला समर्पित

Loading...
You might also like
Loading...