Loading...

विराट कोहली ठरला परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार!

अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे.

विराटचा कसोटी क्रिकेटमध्ये भारताबाहेरील हा कर्णधार म्हणून 12 वा विजय होता. त्यामुळे तो आता परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना सौरव गांगुलीच्या परदेशातील 11 विजयांच्या विक्रमाला मागे टाकले.

गांगुलीने परदेशात 28 कसोटीत भारताचे नेतृत्व करताना 11 विजय मिळवले आहेत. तसेच विराटने आता परदेशात 26 कसोटीत भारताचे कर्णधारपद सांभाळताना 12 विजय मिळवले आहेत.

अँटिग्वा कसोटीत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध मिळवलेला विजय हा भारताचा कसोटी चॅम्पियनशिपमधीलही पहिला विजय ठरला आहे.

परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे भारतीय कर्णधार – 

Loading...

12 – विराट कोहली (26 सामने)

11 – सौरव गांगुली (28 सामने)

6 – एमएस धोनी (30 सामने)

5 – राहुल द्रविड (17 सामने)

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कर्णधार कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी

तब्बल ९६ वर्षांनंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये केला असा पराक्रम

Loading...

रोमांचकारी झालेल्या तिसऱ्या ऍशेस सामन्यात इंग्लंडचा १ विकेटने विजय

You might also like
Loading...