आई ही प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक असते. आपल्या मुलाला घडवण्यासाठी ती प्रत्येक भूमिका निभावते. जगभरात क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल, ज्याच्या यशामध्ये त्याच्या आईचे योगदान नसेल. तसे तर, आईचे ऋण फेडण्यासाठी कित्येक वर्षे कमी पडतील. पण, तिचे प्रेम आणि त्याग यांचा सम्नान करण्यासाठी मातृदिन (मदर्स डे) साजरा केला जातो.
आज (९ मे) मातृदिन आहे. त्यानिमित्ताने आपण अशा काही आईंविषयी जाणून घेऊया, ज्यांनी त्यांच्या मुलांना क्रिकेटच्या जगताचा तारा बनवले. Mothers Day Special : 5 best cricketers supermom information.
लीला राज – मिताली राजची आई
भारतीय क्रिकेट इतिहासात महिला क्रिकेटपटूंचे नावलौकिक करणारी क्रिकेटपटू म्हणजे मिताली राज. मितालीच्या यशामागे तिची आई लीला राज यांचा मोठा हात आहे. त्यांनी आपल्या मुलीला क्रिकेटपटू बनवण्यासाठी आपली मॅनेजरची नोकरी सोडली होती. जेणेकरून त्यांना आपल्या घराबरोबर आपल्या मुलीकडेही लक्ष देता यावे.
मितालीने बऱ्याचदा सांगितले आहे की, तिच्या आईने तिच्यासाठी बरेच त्याग केले आहेत. मी वेळेवर जेवण केले आहे का नाही, हे पाहण्यासाठी ती दिवस रात्र माझ्यावर देखरेख ठेवायची. मला गरज असेल तेव्हा तिची कमी जाणवू नये, म्हणून तिने तिची नोकरी सोडली. एवढेच नाही तर, मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यामुळे सर्वजण माझ्या कुटुंबाची थट्टा करत असायचे. तरीही त्या परिस्थितीत ती खंबीरपणे मैदानावर माझ्यासोबत उभी राहायची आणि मला प्रोत्साहित करायची.
सरोज कोहली – विराट कोहलीची आई
भारताचा कर्णधार विराट कोहली खूप लहान असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई सरोज कोहली यांनी त्याला लहानाचे मोठे केले. विराट ८ वर्षांचा असताना त्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट चालू होती. अशा वेळेलाही त्याच्या आई-वडिलांनी विराटला क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. तो नेहमी पाहत असायचा की त्याचे आई वडील त्याच्यासाठी किती त्याग करतात.
अखेर, १८ डिसेंबर २००६ला विराटचे वडील जग सोडून गेले. त्यामुळे विराट खूप खचला होता. मात्र, त्याच्या आईने धैर्याने आणि शक्तिने त्याला बळ दिले. याचा परिणाम असा झाला की, वडिलांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी विराटने त्याचा क्रिकेट सामना खेळला आणि त्यात ९० धावाही केल्या. सरोज यांनी सांगितले की, त्यादिवशी पासून विराट खूप बदलला. तो क्रिकेटला अधिक गांभिर्याने घेऊ लागला. सरोज यांच्या धैर्याची दाद द्यावी लागेल.
विराटला जेव्हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आले होते तेव्हा त्याची आईही त्याच्यासोबत होती.
रजनी तेंडुलकर – सचिन तेंडुलकरची आई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या त्याच्या क्रिकेटचे सर्व श्रेय त्याची आई रजनी तेंडुलकर यांना देतो. त्यांनी सचिनच्या २००व्या कसोटी सामन्यापुर्वी त्याचा एकही सामना लाइव्ह पाहिला नव्हता. त्या सचिनला फक्त टिव्हिवर खेळताना पाहत असायच्या. मात्र सचिनचा २००वा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी त्याची आई स्टेडियममध्ये यायला तयार झाली होती. त्यावेळी त्यांना त्यांच्या म्हातारपणामुळे स्टेडियमच्या पायऱ्याही व्यवस्थित चढता येत नव्हत्या. म्हणून सचिनने त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती.
देवकी धोनी – एमएस धोनीची आई
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आई देवकी धोनी यांच्याविषयी खूप क्रिकेटप्रेमींना माहिती आहे. धोनी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आईविषयीच्या भावना कधी दाखवत नाही. पण ते त्याच्या आईशी भावनात्मक बंध नेहमी जुळलेला असतो. धोनीच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या आईच्या महतीला नमन करायचे विसरून जातो. पण असे नाही करायला पाहिजे. आपल्या आईने आपल्यासाठी जे काही केले आहे, त्यासाठी तिला धन्यवाद करणे कधीही विसरायला नाही पाहिजे.
शैला वॉर्नर – डेविड वॉर्नरची आई
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर हा त्याची आई शैला वॉर्नर यांना आपला गुरु मानतो. तो आज जे काही आहे ते त्याच्या आईमळे आहे. खरं तर, वॉर्नर सुरुवातीला डाव्या हाताने फलंदाजी करत हवेत शॉट मारत असायचा. त्यामुळे त्याच्या महाविद्यालयीन प्रशिक्षकाने त्याला उजव्या हाताने फलंदाजी करायला सांगितले होते. ज्यामुळे तो हवेत शॉट न मारता व्यवस्थित खेळेल. तिथून वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी करायला सुरुवातही केली. पण, यामुळे त्याची कामगिरी खालावली. यामुळे वॉर्नर खूप खचला. अशात त्याच्या आईने त्याला धीर देत प्रशिक्षकाची भूमिका निभावली. त्यांनी वॉर्नरचा आत्मविश्वास वाढवला.
ट्रेंडिंग घडामोडी-
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना! ‘या’ खेळाडूंना निवडणे टीम इंडियाला पडणार महागात, आहेत ‘आऊट ऑफ फॉर्म’